अहमदनगर बातम्या

Ahmednagar News : राजेंद्र नागवडे सपत्नीक अजित पवारांच्या भेटीस ! अहमदनगरच्या राजकारणात ‘ट्विस्ट’, विखे-पाचपुते टेन्शनमध्ये

Ahmednagar News : अहमदनगरच्या राजकारणात विविध घडामोडींची वेग घेतला आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या अनुशंघाने विविध घडामोडी घडत आहेत. अजित पवार गट सत्तेत सामील झाल्यापासून राष्ट्रवादीची (अजित पवार गट) ताकद वाढीस लागली आहे.

शरद पवार गट सक्रिय झाल्यानंतर अजित पवार हे आपली पाळेमुळे अहमदनगरमध्ये भक्कम करण्यास सरसावले आहेत. आता आणखी एक महत्वाची बातमी आली आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे व महिला जिल्हाध्यक्ष अनुराधा नागवडे यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबईत जाऊन भेट घेतली आहे.

त्यांनी १९ जानेवारीला ‘बापूं’च्या जयंतीचे निमंत्रण देण्यासाठी गेलो होतो असं सांगितलंय परंतु त्याचवेळी अजितदादा गटाच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गायकवाड यांनी या भेटीचा फोटो शेअर करत ‘यशस्वी झालो’ अशी पोस्ट केलीये.

त्यामुळे आता नागवडे अजित दादांसोबत येणार यावर शिक्कामोर्तब तर झाले नये ना अशी अशी चर्चा सुरू झालीये. विशेष म्हणजे या भेटीवेळी जिल्हाध्यक्ष व जिल्हा सहकारी बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड, राज्य बाजार समिती महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब नाहाटा हे देखील तेथेच उपस्थित होते.

अहमदनगरमध्ये आणखीही राजकीय भूकंप होणार?

नागवडे यांच्या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. यातच आता नगर दक्षिणमध्ये अजून बऱ्याच घडामोडी घडणार असून सहकारातील महत्त्वाचे नेते राष्ट्रवादीत डेरेदाखल होतील असे मोठे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे दक्षिणचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गायकवाड यांनी केले आहे.

तर अजित पवार यांनी जिल्हाध्यक्ष गायकवाड यांचा पायगुण चांगला असल्याचे म्हटले आहे. १९ जानेवारीच्या कार्यक्रमानंतर नागवडे काँग्रेस सोडणार असून राष्ट्रवादीत जाणार आहे अशा चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळे आता अहमदनगरमध्ये आणखीही राजकीय भूकंप होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 पाचपुतेंसह विखेंचेही टेन्शन वाढणार?

श्रीगोंद्याची विधानसभेची जागा सध्या भाजपकडे आहे. तेथे आ. बबनराव पाचपुते हे स्टँडिंग आमदार आहेत. परंतु मागील काही दिवसांत आमदार पाचपुते आजारी असल्याचे समजते. तसेच महायुती असल्याने भाजपच्या वाट्याच्या काही जागा राष्ट्रवादीला सोडाव्या लागतील हे देखील सर्वश्रुत आहे.

त्यातच आता नागवडे यांनी आमदारकीची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे आता आमदारकीसाठी पाचपुते यांचे टेन्शन वाढेल हे नक्की. तसेच जर अजित पवार गटाकडून निलेश लंके हे खासदारकीसाठी इच्छुक आहेत.

तसे झाले तर नागवडे यांचे सहकार्य लंके यांना मिळेल असे म्हटले जात आहे. त्यामुळे विखे यांचेही टेन्शन वाढेल असे म्हटले जात आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts