अहमदनगर Live24 टीम ,11 जुलै 2020 : पारनेर तालुक्यातील पाडळी रांजणगाव येथील रहिवासी रविंद्र भानुदास कळमकर यांची पोलिस निरीक्षक पदावर पदोन्नती झाली आहे.
2009 मध्ये रवींद्र कळमकर यांनी एमपीएससी परीक्षेत यश मिळवले आणि त्यांची पोलीस उपनिरीक्षक पदासाठी निवड झाली होती. त्यांची नेमणूक मुंबई येथे पार्कसाईट पोलिस ठाणे विक्रोली येथे झाली.
नंतर त्यांनी माहिम, बांद्रा पोलिस स्टेशन येथे पोलिस उपनिरीक्षक, सहाय्यक पोलिस निरीक्षक पदावर काम केले. सध्या ते अंबोली पोलिस ठाणे जोगेश्वरी (प.) मुंबई येथे कार्यरत होते.
आता त्यांची पदोन्नती होऊन होऊन नंदुरबार येथे नियुक्ती झाली आहे. त्यांच्या निवडीबद्दल आमदार निलेश लंके, राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष विक्रमसिंह कळमकर, राष्ट्रवादी तालुका संघटक आप्पासाहेब कळमकर, ग्रामस्थ आदींनी अभिनंदन केले आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews