Ahmednagar News : अहमदनगर महापालिकेचे पसार असलेले आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांचा जामीन अर्ज फेटाळला असल्याने आयुक्त जावळे आणि त्यांचे स्वीय सहाय्यक यांच्यासमोरील अडचणीत वाढ झाली आहे.
एका बांधकाम व्यासायिकास आठ लाखाची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. त्यावेळी आयुक्त जावळे आणि त्यांचे स्वीय सहाय्यक देशपांडे हे दोघेही पसार झालेले आहेत. आयुक्त जावळे यांचे वकील म्हणून ऍड. सतीश गुगळे यांनी बाजू मांडली तर सरकारी पक्षाच्या वतीने ऍड. अनिल घोडके यांनी बाजू मांडली.
दरम्यान या प्रकणात आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांना आता निलंबित करण्याची मागणी नगरमध्ये जोर पकडू लागली आहे. डॉ. जावळे लाचखोरी प्रकरणात अडकल्यानंतर तस व त्यांचे स्वीय सहाय्यक देखील पसार झाले असून अद्यापपर्यंत पोलिसांच्या हाती आलेले नाहीत.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने डॉ. जावळे यांच्या शासकीय निवासस्थानाची झाडाझती घातली मात्र त्यांच्या हाती काहीच लागलेले नाही मात्र त्यांच्या मालमत्तांचा शोध घेण्याचे आवाहन तपास यंत्रणेपुढे आहे, तर महापालिकेतील डॉ. जावळे यांचे कार्यालय अद्यापही सील आहे.
आयुक्त पंकज जावळे हे पसार होऊन आठवडा होत आला असून तरीदेखील पोलिसांना त्याचा सुगावा लागत नाही ही बाब पोलिसांच्या कार्यक्षमतेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे.
खासदार निलेश लंके यांनी यापूर्वीच याबाबत टीका केलेली होती आणि पोलीस खात्यातील अनेक जणांच्या फाईल आता निघतील असा इशारा देखील दिला होता. खासदार निलेश लंके यांच्या समर्थकांवर देखील लोकसभा निवडणुकीच्या वेळी किरकोळ कारणावरून गुन्हे दाखल करण्यात आलेले होते त्यावरून देखील निलेश लंके यांच्या नाराजी आहे.
तर दुसरीकडे आयुक्त जावळे आणि त्यांचे स्वीय सहाय्यक पोलिसांच्या ताब्यात येत नसल्याकारणाने पडद्यापाठीमागे मोठ्या घडामोडी होत असल्याची देखील शहरात चर्चा आहे.