अहमदनगर बातम्या

Ahmednagar News : शाळा परिसरात रोडरोमिओंचा वावर ! पालकांची कारवाई करण्याची मागणी

Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील विद्यालयात पाचवी ते बारावीपर्यंतचे शिक्षण घेण्यासाठी करंजी गावासह परिसरातील पंधरा- वीस गावचे विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षण घेण्यासाठी येतात एवढेच नव्हे तर जवळच्या नगर तालुक्यातील व आष्टी तालुक्यातीलदेखील काही विद्यार्थी व विद्यार्थिनी करंजीत शिक्षण घेण्यासाठी दररोज येतात;

परंतु गेल्या काही दिवसांपासून शाळा भरण्याच्या वेळी व शाळा सुटण्याच्या वेळी गावातील काही टवाळखोर तरुण या शाळा परिसरासह ज्या रस्त्याने विद्यार्थिनींची ये जा असते,

त्या रस्त्यावर भरधाव मोटारसायकल चालवून व शाळा परिसरात फेरफटका मारून शालेय विद्यार्थिनींना मानसिक दृष्ट्या त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत. शाळा सुटल्यानंतर भोसे रोडवर विद्यार्थ्यांची मोठी गर्दी असते, अशावेळी गावातील काही टवाळखोर मुद्दा या रस्त्यावर कर्ण कर्कश आवाज काढत मोटारसायकली पळवतात.

अनावधानाने एखादा अपघातदेखील या मोटारसायकलींमुळे होऊ शकतो तसेच शाळा परिसरातदेखील काही टवाळखोर तरुण येऊन हुलडबाजी करतात, अशा सर्व टवाळखोरांवर आता स्थानिक राजकीय नेते मंडळीसह पोलीस प्रशासनदेखील नजर ठेवून कारवाई करण्याची मागणी माजी सैनिक जालिंदर अकोलकर, सुरेश अकोलकर, राहुल अकोलकर, दत्तू अकोलकर यांच्यासह अनेकांनी केली आहे.

शाळा परिसरात विद्यार्थी वगळता कोणीही टवाळखोर तरुण पोलिसांना आढळून आल्यास किंवा शाळा सुटल्यानंतर या रस्त्याने भरधाव मोटारसायकली चालवताना आढळल्यास अशा तरुणांवर पोलीस प्रशासन कडक कारवाई करणार असून,

वेळप्रसंगी शाळा सुटल्यानंतर या रस्त्यावरील काही सीसीटीव्ही फुटेचा आधार घेऊन, वेगाने मोटारसायकली चालवणाऱ्यांना शोधून त्यांच्यावर हमखास कारवाई केली जाईल. मुलींची छेड काढणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी दिला आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts