अहमदनगर बातम्या

दळणवळणाच्या दृष्टीने रस्ते महत्वाचे – खा. डॉ. सुजय विखे पाटील

10 months ago

Ahmednagar News : बोल्हेगावसह नागापूर उपनगर हे झपाट्याने विकसित होत आहे. मात्र बोल्हेगाव गणेश चौक ते केशव कॉर्नर पर्यंतचा व आंबेडकर चौक ते निंबळक रोड पर्यंत रस्ता दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत खराब झाला आहे.

या परिसरातील कॉलनीना जोडणारे मुख्य रस्ते आहे. या रस्त्याचे काम मार्गी लागावे यासाठी आ. संग्राम जगताप यांनी जिल्हा नियोजन समितीकडे पाठपुरावा केला असून त्या कामासाठी मोठा निधी उपलब्ध झाला आहे. लवकरच या रस्त्याचे काम मार्गी लागणार असल्याचे प्रतिपादन खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.

बोल्हेगाव येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन मा. मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी खा.डॉ. सुजय विखे पाटील, आ. संग्राम जगताप, माजी सभापती कुमारसिंह वाकळे, दत्ता पाटील सप्रे, राजेश कातोरे, आकाश कातोरे, मदन आढाव आदी उपस्थित होते.

आ. संग्राम जगताप म्हणाले की, हा परिसर शहराचे एक मोठे उपनगर बनले आहे. या ठिकाणी औद्योगिक वसाहतीमध्ये कामगार वर्ग वास्तव्यास असून, त्यांना सुख सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.

या दृष्टीने या दोन्ही महत्त्वाच्या रस्त्याच्या कामासाठी जिल्हा नियोजन समितीकडे पाठपुरावा केला. या कामांमुळे बोल्हेगाव नागापूरच्या विकासाला गती प्राप्त होणार आहे.

Recent Posts