Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यासाठी महत्वाची व महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी आली आहे. मागील काही दिवसापासून महाराष्ट्रातील अनेक नेते ईडीच्या रडारवर आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू व अहमदनगर जिह्यातील कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांना ईडीने समन्स बजावले आहेत. बारामती अॅग्रो कंपनी प्रकरणी ईडीने रोहित पवार यांना चौकशीचं समन्स बजावलेले असून आता आ. रोहित पवार यांची बुधवारी चौकशी होईल.
येत्या बुधवारी चौकशीसाठी रोहित पवार यांना ईडी कार्यालयात जावे लागणार आहे. रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रोशी संबंधित काही ठिकाणी मागील दोन आठवड्यापूर्वी ईडीने छापेमारी केलेली होती. त्यानंतर आता रोहित पवार यांना ईडीचं समन्स बजावण्यात आल्याने राजकीय वलयात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.
रोहित पवार यांच्याविरोधात ईडीने नुकतीच मोठी कारवाई केली असून ईडीने रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीशी संबंधित सहा ठिकाणी छापेमारी केली होती. यामध्ये बारामती अॅग्रोच्या पुणे आणि बारामती येथील कार्यालयांचा देखील समावेश होता. ईडीकडून कागदपत्रांची छाननी करण्यात आली होती.
इंडीच्या या छापेमारीमुळे राजकारणात एकच खळबळ उडाली उडाली होती. ज्यावेळी ईडीने ही कारवाई केली तेव्हा रोहित पवार हे विदेशात गेले होते. कारवाई झाल्यानंतर ते दुसऱ्या दिवशी मुंचईत परतले होते. त्यांनी या कारवाई झाल्यानंतर भाजप व राष्ट्रवादीच्या अजित पवार गटावर टीका केली होती.
बारामती ऑम्रो लिमिटेड हा एक उद्योग समूह असून आ. रोहित पवार हे बारामती अॅग्रोचे सीईओ असून रोहित पवार यांचे वडील राजेंद पवार हे संचालक आहेत. पशु खाद्य हे याचे प्रोडक्ट असून या कंपनीचे बारामती आणि संभाजीनगर येथेही कारखाने आहेत. तसेच या द्वारे दूध व्यवसाय, पोल्ट्री फार्म आणि चिकन व्यवसायही केले जात आहेत. आता आ. रोहित पवार यांना ईडीचे समन्स आल्याने व बुधवारी चौकशी होणार असल्याने सर्वांची नजर तिकडे लागली आहे.