अहमदनगर बातम्या

MLA Rohit Pawar : कर्जत-जामखेड मतदारसंघात एमआयडीसीसाठी रोहित पवारांचे अनोखे आंदोलन

MLA Rohit Pawar : आमदार रोहित पवार यांची आपल्या कर्जत-जामखेड मतदारसंघात एमआयडीसीच्या मागणीसाठी आक्रमकता कायम आहे. त्यांनी बुधवारी मोठ्या अक्षरामध्ये ‘एमआयडीसी’ लिहिलेले जॅकेट परिधान करून विधानभवनाच्या परिसरात प्रवेश केला. त्यांनी अनोख्या पद्धतीने आपले म्हणणे मांडायचा प्रयत्न केला. उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही हे जॅकेट पाहिल्यानंतर रोहित पवार यांच्याशी चर्चा केली.

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मागील सप्ताहात कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी एमआयडीसीच्या मागणीसाठी विधानभवन आवारात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखाली भर पावसात बसून आंदोलन केले होते.

यानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी बैठक घेण्यासाठी पवार यांना निमंत्रित केले, मात्र ही बैठकच होवू शकली नाही. तेव्हापासून आमदार रोहित पवार एमआयडीसीच्या मागणीसाठी आक्रमक झाले असून आता ‘एमआयडीसी’ असे इंग्रजीमध्ये लिहिलेले जॅकेट परिधान करून आपले म्हणणे मांडायचा प्रयत्न करत सर्वांचे लक्ष वेधले.

ते हे जॅकेट घालून विधानभवनाच्या आवारात आल्यानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांची नजर त्या जॅकेटवर पडली. ते पुढे चाललेल्या रोहित पवारांचा मागे गेले आणि त्यांना थांबवून या जॅकेटवरील मजकूर वाचला.

जॅकेटच्या मागच्या बाजूने ‘ध्येय विकासाचा ठेवूया, वेध भविष्याचा घेऊया, युवा शक्तीला संधी देऊया आणि फक्त मुद्द्याचे बोलूया,’ असे लिहिले होते. ‘मंत्री उदय सामंत एमआयडीसीबाबत लवकरच तोडगा काढतील, यासाठी माझा पाठपुरावा सुरू आहे,’ असे नंतर माध्यमांशी बोलतना रोहित पवार म्हणाले.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts