अहमदनगर बातम्या

साई आश्रया अनाथ आश्रम : मृत्युच्या वाटेवरील त्याचा प्रवास थांबवत अद्याप माणुसकी जिवंत असल्याचा दिला पुरावा

Ahmednagar News : मनोरुग्ण, निराधार, बेवारस व्यक्तींची सेवा करणे, त्यांना औषधोपचार देणे, भूकेल्याला अन्न व तहानल्याला पाणी, गरजूला औषधोपचार देणे हीच खरी साईसेवा आहे. याची जाणीव ठेवत बेळगाव परिसरातून आलेल्या मात्र मरणासन्न अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडलेल्या एका ५५ वर्षीय इसमाला गरम पाण्याने अंघोळ घालून चहापाणी, जेवण व नवे कपडे देऊन त्याची जगण्याची आशा पल्लवीत केली व मृत्युच्या वाटेवरील त्याचा प्रवास साई आश्रया अनाथ आश्रमाचे संस्थापक गणेश दळवी यांनी थांबवला.

अनेकांनी काही दिवसांचा सोबती आहे, म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष केलं असलं, तरी माणूसपण, माणुसकी व संवेदना अजून जिवंत असल्याचा पुरावा आपल्या कृतीतून राहाता शहरातील नितीन सनासे व त्यांच्या सहकारी मित्रांनी दिला.

राहाता शहरात पोलीस स्टेशनजवळ नगर- कोपरगाव राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला नवीन पंचायत समितीकडे जाणाऱ्या रोडच्या बाजूला एक ५५ वर्षीय माणूस मरणासन्न अवस्थेत पडलेला होता. दोन दिवसांनंतर हा माणूस इथून का जात नाही, याची कपडे विक्रेते सनासे बंधूंनी चौकशी केली.

त्यावेळी मन सुन्न करणार वास्तव समोर आलं. पोटातअन्नाचा कण नाही, शरीरावर जखमा, हातापायांना सूज, चालता येईना, बोलता येईना, निशब्द चेहरा, थंडीने शरीर कुडकुडत होतं, वेदनांनी मन रडत होतं, जागचे हलता येत नसल्याने कपड्यातच मलमूत्र झालेले, मोठी दुर्गंधी पसरलेली, अशा अवस्थेत तो व्यक्ती अखेरच्या घटका मोजत होता. दुर्गंधीमुळे जवळून जाणारे येणारे लोक मदत करण्याऐवजी त्याच्याकडे बघून नाकाला रुमाल लावून पुढे चालत होते.

एकप्रकारे लोक त्याच्या मृत्यूची वाट बघत होते. याचवेळी मानवी संवेदना जिवंत असणारे व माणुसकी जपणारे ओम पानसरे, नितीन सनासे,मयूर आमकर, आकाश सनांसे,अन्नाचा कण नाही, शरीरावर जखमा, हातापायांना सूज, चालता येईना, बोलता येईना, निशब्द चेहरा, थंडीने शरीर कुडकुडत होतं, वेदनांनी मन रडत होतं, जागचे हलता येत नसल्याने कपड्यातच मलमूत्र झालेले, मोठी दुर्गंधी पसरलेली, अशा अवस्थेत तो व्यक्ती अखेरच्या घटका मोजत होता.

दुर्गंधीमुळे जवळून जाणारे येणारे लोक मदत करण्याऐवजी त्याच्याकडे बघून नाकाला रुमाल लावून पुढे चालत होते.

एकप्रकारे लोक त्याच्या मृत्यूची वाट बघत होते. याचवेळी मानवी संवेदना जिवंत असणारे व माणुसकी जपणारे ओम पानसरे, नितीन सनासे,अवि सनासे, राम पानसरे, मनोज आव्हाड, ऍड. रामनाथ सदाफळ, अनिकेत तुपे, नवनाथ मूर्तडक, बजरंग दलाचे कार्यकर्ते यांनी या व्यक्तीला मदतीचा हात दिला.

साई आश्रया अनाथ आश्रमाचे संस्थापक गणेश दळवी यांनी रात्री १० वाजता रुग्णवाहिका घेऊन राहात्याला येत या इसमाची विचारपूस केली व त्याची साईंच्या भूमीत शिर्डी येथे निवाऱ्याची व्यवस्था केली. बेळगाव परिसरातून आल्याचे त्या व्यक्तीने सांगितले.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts