अहमदनगर बातम्या

एकही सभा न घेता सलग तिसऱ्यांदा विधानसभेत पोहोचलेले संग्राम जगताप हे पहिले आमदार? मताधिक्यात जगतापांचा सगळ्याच ठिकाणी बोलबाला

Ahilyanagar News:- विधानसभा निवडणुकीमध्ये संपूर्ण राज्यांमध्ये महायुतीचा बोलबाला दिसून आला.अगदी त्याच पद्धतीने अहिल्यानगर जिल्ह्यात देखील महायुतीच पावरफूल ठरल्याचे दिसले. साधारणपणे 12 विधानसभा मतदारसंघांमधून तब्बल दहा ठिकाणी महायुतीचे उमेदवार विजयी झाले.

यातील जर आपण अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघाच्या दृष्टिकोनातून बघितले तर या ठिकाणी देखील आमदार संग्राम जगताप यांच्या रूपाने महायुतीच पावरफुल ठरल्याचे दिसून आले.

जर आपण विधानसभा निवडणुकीचे मतमोजणीचा दिवस बघितला तर त्या दिवशी पहिल्या फेरीपासून जगताप यांनी आघाडी घेतली व शहरातील माळीवाडा व भिंगार हा भाग सोडला तर सर्वच ठिकाणी महायुतीच पावरफूल ठरल्याचे दिसून आले. इतकेच नाही तर केडगाव येथे देखील आमदार संग्राम जगताप यांनाच मताधिक्य जास्त मिळाले.

सर्वत्र आमदार जगताप यांचा बोलबाला
महायुतीच्या माध्यमातून आमदार संग्राम जगताप यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार माजी महापौर अभिषेक कळमकर यांचा 39 हजार मतांनी पराभव केला व तिसऱ्यांदा विधानसभेत पोहोचण्याची किमया साध्य केली. विशेष म्हणजे आमदार जगताप यांच्या करिता शहरांमध्ये एकही सभा झाली नाही

व एकही सभा न घेता सलग तिसऱ्यांदा विधानसभेत पोहोचणारे कदाचित जगताप हे पहिले आमदार असावेत असे देखील बोलले जात आहे. त्यांची जर या निवडणुकीतील प्रचाराची स्ट्रॅटेजी बघितली तर त्यांनी वैयक्तिक गाठीभेटी घेण्यावर जास्त भर दिला व प्रचार फेऱ्या यांच्या माध्यमातून मतदारांशी थेट कनेक्टिव्हिटी वाढवली.

प्रचाराचे सूक्ष्म नियोजन आणि विकास कामांच्या जोरावर त्यांनी महाविकास आघाडीला या निवडणुकीत मात दिल्याचे दिसून आले. या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा करिष्मा चालून कळमकर यांना फायदा होईल अशी एक शक्यता वर्तवण्यात येत होती. परंतु पवारांनी अभिषेक कळमकर यांच्यासाठी एकही सभा घेतली घेतली नाही.

आमदार संग्राम जगताप यांचा जो काही प्रचार होता तो अतिशय नियोजन पद्धतीने झाला व त्यामुळे पवारांचा देखील करिष्मा चालला नाही. शहरातील माळीवाड्याचा विचार केला तर या ठिकाणी शिवसेनेचे वर्चस्व असल्यामुळे महाविकास आघाडीला या ठिकाणी मताधिक्य मिळेल असे शक्यता होती.

परंतु आमदार संग्राम जगताप यांचा माळीवाड्यात देखील चांगला कॉन्टॅक्ट आहे व यामुळे या भागात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी सभापती अविनाश घुले यांनी देखील जगताप यांच्यासाठी प्रचार यंत्रणा राबवली. माळीवाळ्यातील काही बुथ जर सोडले तर इतर सगळ्याच ठिकाणी जगताप यांचाच करिष्मा दिसून आला.

नागापूर पासून झाली होती जगताप यांच्या आघाडीची सुरुवात
अहिल्यानगर शहर मतमोजणीला सुरुवात झाली ती नागापूर येथून झाली. नागापूर परिसरामध्ये एकूण आठ बूथ होते व या आठही बूथवर आमदार संग्राम जगताप यांनाच मताधिक्य मिळाल्याचे दिसून आले.

त्यानंतर मात्र आमदार संग्राम जगताप यांच्या मताधिक्यात घट झालीच नाही. थोड्याफार प्रमाणात भिंगार भागामध्ये जगताप यांच्या मताधिक्यात घट झाली व त्यानंतर मात्र 22 व्या फेरीपर्यंत त्यांचे मताधिक्य तब्बल 39 हजारांवर पोहोचले.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts