अहमदनगर बातम्या

39 हजार 452 मताधिक्याने संग्राम जगताप यांची विजयाची हॅट्रिक! आ. संग्राम जगताप यांच्या रूपाने अहिल्यानगर शहराला 1995 तर मिळणार मंत्रीपद?

Ahilyanagar News:- महाराष्ट्र विधानसभा 2024 च्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाले व राज्यामध्ये महायुतीने दणदणीत विजय मिळवत महाविकास आघाडीला चारीमुंड्या चित केले. या निवडणुकीच्या निकालाची वैशिष्ट्ये जर बघितले तर काँग्रेस आणि इतर पक्षांचे अनेक मातब्बर नेत्यांना या निवडणुकीत पराभवाची चव चाखावी लागली.

यामध्ये जर प्रामुख्याने अहिल्यानगर जिल्ह्याचा विचार केला तर यामध्ये संगमनेर विधानसभा मतदारसंघातून बाळासाहेब थोरात यांच्यासारखे ज्येष्ठ नेते देखील पराभूत झाले तर काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना देखील पराभवाची चव आखावी लागली. तर बऱ्याच मतदारसंघांमध्ये अनपेक्षित रित्या असे निकाल समोर आले.

अहिल्यानगर जिल्ह्यातील बाराही विधानसभा मतदारसंघांमध्ये जर बघितले तर महायुतीची लाट आपल्याला दिसून आली.अगदी याचप्रमाणे अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार संग्राम जगताप यांनी तब्बल एक लाख 17 हजार 332 मताधिक्याने विजयश्री खेचून आणली व या विधानसभा मतदारसंघातून आमदार होण्याची हॅट्रिक पूर्ण केली आहे.

आमदार संग्राम जगताप यांना एक लाख 17 हजार 332 मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार महाविकास आघाडीचे अभिषेक कळमकर यांना 77 हजार 880 मते मिळाली. तसेच पोस्टलची मते बघितली तर ती संग्राम जगताप यांना 950 तर कळमकर यांना 800 मते मिळाली.

आज नगर शहर विधानसभा मतदारसंघाचे मतमोजणी वखार महामंडळ एमआयडीसी येथे एकूण 22 फेऱ्यांमध्ये पार पडली.जेव्हापासून पोस्टल मतदानाची काउंटिंग सुरू झाली तेव्हापासूनच संग्राम जगताप यांनी आघाडी घेतली व पहिल्या फेरीपासूनच मताधिक्यामध्ये वाढ होत गेली व प्रतिस्पर्धी उमेदवार कळमकर हे त्यांची विजयी रथ रोखू शकले नाहीत. 22 व्या फेरी अखेर जगताप यांनी विक्रमी 39 हजार 452 मताधिक्य घेत विजयाची नोंद केली.

संग्राम जगताप यांना मिळणार मंत्रिपदाची संधी?
अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने तिसऱ्यांदा विजयी झालेले आमदार संग्राम जगताप यांना मात्र यावेळी मंत्रिपदाची संधी नक्की मिळणार असा दावा त्यांच्या समर्थकांकडून केला जात असून तसे झाले तर 1995 नंतर अहिल्यानगर शहराला मंत्रिपदाची संधी मिळणार आहे.

या आधीचा जर इतिहास बघितला तर स्व. अनिल राठोड यांना विसाव्या शतकात म्हणजे १९९५ यावर्षी युती सरकारमध्ये मंत्रिपदाची संधी मिळाली होती. त्यानंतर आता थेट 2024 मध्ये म्हणजेच 21व्या शतकात आमदार संग्राम जगताप यांनी या निवडणुकीत हॅट्रिक मिळवल्यामुळे त्यांना मंत्रिपद मिळाल्यास हे शहराच्या दृष्टिकोनातून देखील महत्त्वाचे ठरणार आहे

आणि आमदार संग्राम जगताप यांच्या रूपाने अहिल्यानगर शहराला मंत्रिपद मिळणार अशी अपेक्षा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काळात काय राजकीय घडामोडी होतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts