अहमदनगर बातम्या

आंतरराष्ट्रीय दर्जाचे संत रविदास अध्ययन केंद्र महाराष्ट्रात उभारणार

मुंबई येथे सकल चर्मकार समाज, महाराष्ट्र राज्यच्या शिष्टमंडळाने सामाजिक न्याय विभागाचे मुख्य सचिव सुमंत भांगे सुमंत भांगे यांची भेट घेतली. असुन नुकत्याच एनएसएफडीसी साठी मंजूर झालेल्या 22 कोटी रुपये निधी, महाराष्ट्रात कौशल्य केंद्र, अद्यावत अभ्यासिका, लघुउद्योग अशा महत्त्वपूर्ण विषय पुर्ण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

याप्रसंगी सकल चर्मकार समाज,महाराष्ट्र राज्य च्या वतीने प्रातिनिधिक स्वरुपात प्रा.जयंत आहेर(नासिक), हिरालाल गतखणे (छत्रपती संभाजीनगर), वसंतराव कुभंरे (भंडारा) आणि विजय घासे (अहमदनगर) हे उपस्थित होते. याबरोबरच सध्या एनएसएफडीसीच्या नवीन कर्ज प्रकरणासाठी लावलेली जाचक अटी रद्द करण्याची मागणी देखील शिष्टमंडळाच्या वतीने करण्यात आली.

लवकरात लवकर या वर तोडगा काढू. समानतेचे पुरस्कर्ते संत रविदास यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे अध्ययन केंद्र महाराष्ट्रात उभारणार असल्याची ग्वाही देखील दिली. तसेच लिडकॉमचे नवनिर्वाचित एमडी. धम्मज्योती गजभिये यांची भेट घेतली असता त्यांनी समाजाच्या प्रत्येक अडीअडचणी वर मात करु, असे आश्वासन यावेळी यांनी दिले.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts