अहमदनगर Live24 टीम, 6 नोव्हेंबर 2020 :- राजस्थान, ओदिशा, सिक्कीम या राज्यानंतर महाराष्ट्रातही दिवाळीत फटाक्यांवर बंदी घालण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे या बंदीबाबतचा प्रस्ताव आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडला आहे.
यातच राज्यात फटाक्यांवर बंदी आलीच पाहिजे अशी मागणी अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केली आहे.
राजस्थान, नवी दिल्ली, बंगाल या सर्व राज्यांमध्ये फटाक्यांवर बंदी घालण्याचा निर्णय त्या राज्यसरकारने घेतला आहे. खर पाहिलं तर फटक्यांमुळे प्रदूषण, धूर, आवाज मोठ्या प्रमाणात होत असते म्हणून सत्यजित तांबे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना विनंती केली आहे.
याबाबत बोलताना सत्यजित तांबे म्हणाले कि, महाराष्ट्रात देखील त्यांनी जास्त धूर होणारी, जास्तीच्या आवाजाची फटाक्यांवर बंदी आणली पाहिजे, तसेच कायमची बंदी आणली पाहिजे.
यामध्ये मोठ्या प्रमाणावर व्यापारी वर्ग सहभागी असेल, अनेक लोकांनी माल घेतला असेल, परंतु पुढील सात पिढ्यांचा विचार करून सध्या थोडे नुकसान झाले तरी चालेल परंतु येणाऱ्या पिढ्यांसाठी ही फटाक्यांवरची बंदी आलीच पाहिजे.
दरम्यान दिवाळीत फटाक्यांच्या धुरामुळे श्वसनाला बाधा येऊ शकते. कोरोनाच्या आजारात श्वासोच्छवासाचा त्रास होतो. त्यामुळे यंदाची दिवाळी फटाकेमुक्त असावी अशी आरोग्य विभागाची भूमिका आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved