अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :-विधानपरिषदेवर राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या नावाची चर्चा सुरु होती.
मात्र महाविकास आघाडी सरकारने राज्यपालांना सादर केलेल्या यादीत कॉंग्रेसकडून तांबे यांचे नाव नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे तांबे समर्थक निराश झाले आहेत.
स्वत: सत्यजित तांबे यांनीही व्टिटरवर एकाच वाक्यात सूचक प्रतिक्रिया दिली आहे. ‘श्रध्दा और सबुरी’ एवढीच प्रतिक्रिया देत तांबे यांनी आपण अजूनही संधीची वाट पाहण्यास तयार असल्याचे सूचित केले आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved