अहमदनगर Live24 टीम, 03 फेब्रुवारी 2021:-सावेडी कचरा डेपोला मंगळवारी सायंकाळी अचानक आग लागली. डेपाेत साचलेला कचरा पटेल्याची माहिती मिळताच अग्निशामक विभागाने आग नियंत्रणासाठी दोन वाहने घटनास्थळी पाचारण केली.
महानगर पालिकेच्या सावेडी कचरा डेपोला वारंवार आग लागण्याच्या घटना घडत आहेत. वर्षभरापूर्वी देखील या डेपोला आग लागली होती. त्यावेळी शहराचा संपूर्ण कचरा या डेपोत प्रक्रियेसाठी नेला जात होता.
आता बुरूडगावचा येथे कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात आल्याने सावेडी ऐवजी बुरूडगावच्या डेपोत कचरा पाठवला जातो. सावेडी डेपो सध्या बंद असला तरी यापूर्वीच्या कचऱ्याचे ढिग आहेत.
मंगळवारी सायंकाळी अचानक या डेपोला आग लागल्याने मनपाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आग मोठी असल्याने नियंत्रणाचे आव्हान आहे.
अग्निशामक विभागप्रमुख शंकर मिसाळ यांनी तातडीने दोन अग्निशामकची वाहने सावेडीकडे रवाना केली. डेपो परिसरात धूराचे लोळ पसरल्याने जवानांची आग नियंत्रणात आणण्यासाठी उशिरापर्यंत कसरत सुरूच होती. आग अधिक पसरू नये यासाठी एक पोकलेन मशिनच्या माध्यमातून कचरा बाजुला करण्याचे काम हाती घेतले.