Ahmednagar News : सध्या सर्वच भागात बिबट्यांचा संचार वाढत आहे. रात्री तसेच भरदिवसा देखील बिबट्यांचे हल्ले होत असल्याने ग्रामीण भागातील नागरिक तसेच शालेय विद्यार्थ्यामध्ये सुध्दा भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे वनविभागाने जादा यंत्रणेचा वापर करत या भागात बिबट्यांचा बंदोबस्त करावा. असे निर्देश पालकमंत्री विखे पाटील यांनी दिले.
निमगाव टेंभी येथे बिबट्याच्या हल्ल्यात मृत पावलेल्या श्रीमती संगिता वर्पे यांच्या कुटुंबियांची नुकतीच महसूल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेट घेवून सांत्वन केले. यावेळी त्यांना शासन मदतीचा सुमारे २५लाख रुपयांच्या मदतीचे पत्र सुपूर्त केले.
मंत्री विखे पाटील यांनी घटनास्थळाची पाहाणी करून या परीसरात बिबट्यांचा असलेला वावर आणि याबबात कठोर उपाय योजना करण्याबाबतच्या सूचना वनविभागास दिल्या. या परीसरात मोठ्या प्रमाणात शेतीक्षेत्र आहे.
शिरापूर घाटात बिबट्यांचा मोठ्या प्रमाणात संचार असल्याच्या तक्रारी ग्रमास्थांनी केल्या. याबाबत गांभीर्यपुर्वक दखल घेवून वन विभागाने ड्रोन तंत्रज्ञानाचा उपयोग करून बिबट्यांचा शोध घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
या भागात रस्तांच्या असलेल्या अडचणीबाबतही ग्रामस्थांनी मंत्री विखे पाटील यांच्याकडे तक्रारी केल्या. त्यावर याबबात तातडीने प्रस्ताव तयार करा निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही ना.विखे पाटील यांनी दिली.
यावेळी जिल्ह्याचे वन अधिकारी धर्मवीर सालविठ्ठल उपविभागीय अधिकारी संदीप पाटील तहसिलदार धीरज मांजरे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.