Ahmednagar News : पाथर्डी व नगर तालुक्याच्या दळणवळणासाठी महत्त्वपूर्ण ठरणारा कोल्हार घाट दुरुस्तीसाठी सुमारे तीन ते चार कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, या रस्त्याचे उद्घाटन झाले मात्र रस्ता दुरुस्तीच्या कामाला अद्यापही सुरुवात झालेली नाही.
त्यामुळे या घाटातील खराब रस्त्यामुळे या ठिकाणी अपघाताची मालिका सुरूच आहे. दोन दिवसापूर्वी सोकेवाडी येथील भानुदास मारुती पालवे यांच्या मोटरसायकलला अपघात झाल्याने ते या अपघातात गंभीर जखमी झाले.
चार आठ दिवसाला या घाटात खराब रस्त्यामुळे अपघात होत असून, या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाची मागणी कोल्हारचे युवानेते विजय पालवे यांनी केली आहे. कोल्हार घाटातील एक दोन धोकादायक वळण प्रवाशांसाठी अडचणीचे असून काही ठिकाणी संरक्षण कठडे देखील तुटलेले आहेत.
त्यामुळे प्रवासी जीव धोक्यात घालून या घाटातून प्रवास करतात. घाटाच्या दुरुस्तीची मागणी विजय पालवे, उपसरपंच गोरक्ष पालवे, ईश्वर पालवे, शर्मा पालवे, संदिप पालवे,
ज्येष्ठ नेते महादेव पालवे गुरुजी, सरपंच राजू नेटके, युवानेते अरुण पालवे, विष्णू गिते, किशोर पालवे, सोपान पालवे, मिठू पालवे, मदन पालवे, आप्पा गर्जे यांनी केली आहे.