अहमदनगर बातम्या

मागील १० वर्षांची कसर काढून शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये विकासाची कामे उभी करणार : माजी खासदार वाकचौरे

Ahmednagar News : राजकारणात नवीन असल्यामुळे मी चुकलो व फसलो. जनतेने माझा पराभव केला. शिवसेनेने मला घर वापसी देऊन पुन्हा काम करण्याची संधी दिली. मागील १० वर्षांची कसर काढून शिर्डी लोकसभा मतदारसंघात विकासाचे मोठे काम उभे करील, असे आश्वासन माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी दिले.

वाकचौरे म्हणाले, आपल्या खासदारकीच्या कालखंडात केलेल्या विकासकामामुळे आपण जनतेत लोकप्रिय असून प्रत्येक गावात विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने काम केले. मागील १० वर्षांत कोणतेही कामे न झाल्यामुळे जनतेत संतप्त भावना आहे.

त्यामुळे सर्वत्र लोक आपल्या उमेदवारीचे स्वागत करत आहे. शिक्षण, रस्ते, पाणी आदी समस्यांवर आपण काम करणार आहोत. सह्याद्रीच्या खोऱ्यातील पाणी मराठवाड्याकडे वळवण्याचा समन्यायी कायदा अन्यायकारक असून या बाबत आपण प्रामुख्याने लक्ष घालणार आहोत.

निळवंडे धरण प्रकल्पासाठी केंद्रीय पातळीवरील सर्व परवानग्या आपल्या प्रयत्नातून मिळाले असल्याचे सांगून, त्यांनी या बाबत श्रेय कोणीही घेऊ द्या मात्र, या प्रकल्पासाठी आपले योगदान असल्याचे त्यांनी सांगितले.

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एका कार्यक्रमात आपण इकडे-तिकडे कशाला भरकटता, परत या असे सांगून मला सन्मानाने सेनेत प्रवेश दिला. या संधीमुळे मी केंद्र सरकारच्या सर्वाधिक योजना मतदारसंघाच्या विकासासाठी आणेल,

या अगोदर आपण केलेली कामे जनतेला माहिती आहे. त्यामुळे आपला विजय निश्चित असल्याचा दावा त्यांनी केला आहे. एकूणच माजी खासदार वाकचौरे यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघाची तयारी सुरू केली असून शनिवारी माजी खासदार भाऊसाहेब वाकचौर यांनी संगमनेर तालुक्याच्या दौऱ्यात मैत्री संबंधांना उजाळा दिला.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts