Ahmednagar News : शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घराघरात पोहोचविण्याच्या प्रयलांना चांगला प्रतिसाद मिळाला.
आता शिवपुत्र संभाजी महानाट्याच्या रूपाने छत्रपती संभाजी महाराजांचे विचार घराघरात पोहचविण्याचा प्रयत्न आहे. या महानाट्याच्या आयोजनाच्या मागे कोणताही राजकीय संबंध नसल्याचे आ. नीलेश लंके यांनी ठामपणे सांगितले.
महानाट्याच्या खर्चाबाबत कोल्हे यांच्याशी चर्चा झालेली नाही. सेटअप, ध्वनीक्षेपन यंत्रणा त्यांचीच असून त्यांनी ती इकडे पाठविली असल्याचे आ. लंके यांनी स्पष्ट केले. १ मार्चपासून शिवपुत्र संभाजी या महानाट्यास प्रारंभ होणार असून,
त्या पाश्र्वभुमीवर आ. लंके यांनी गुरूवारी कार्यक्रमस्थळी पत्रकारांशी संवाद साधला. आ. लंके म्हणाले की, सध्या विविध समाजात तेढ, वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. जातीयवाद केला जात आहे.
चुकीच्या पध्दतीने समाजाला भरकटविले जात आहे. समाजामध्ये एकोपा निर्माण करण्यासाठी शिवस्वराज्य यात्रा तसेच शिवपुत्र संभाजीराजे महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे.
त्याचा राजकारणाशी संबंध जोडू नये. आतापर्यंत ११ लाख लोकांपर्यंत महानाट्याच्या प्रवेशिका पोहोच करण्यात आल्या आहेत. त्यासाठी प्रतिष्ठानच्या पाच हजार कार्यकत्यांनी परिश्रम घेतले.
चांगले काम करणारांकडे लोक बोट दाखवितात
कोरोना काळात आम्ही कोव्हीड सेंटरचे काम केले. या कामाची चौकशी लावण्याचाही काही महाभागांनी प्रयत्न केला. आमचे काम पारदर्शी असल्याने त्यात काही निष्पन्न होण्याचा प्रश्नच नव्हता.
चांगले काम करणारांकडे लोक बोट दाखवतात. त्याचा विचार न करता पुढे जायचे असते. एकदा ठेच लागल्यानंतर माणूस शहाणा होतो, असे लंके म्हणाले.