अहमदनगर Live24 टीम,9 ऑगस्ट 2020 :- अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांचीसंख्या झपाट्याने वाढत आहे. प्रशासन अनेक उपाययोजना करत आहे. परंतु तरीही कोरोना रुग्णांची संख्या जिल्ह्यात १० हजार पार झाली आहे.
परंतु कोरोना रुग्णांना लागणाऱ्या ऑक्सिजनची निर्मिती पूर्वीइतकीच आहे. मात्र रुग्ण वाढल्याने ऑक्सिजनची मागणी वाढली आहे.
या मागणीच्या तुलनेत ऑक्सिजनचा पुरवठा होत नसल्याने अहमदनगरमध्ये पाहिजे तेवढा ऑक्सिजन उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे. यामुळे रुग्णांच्याही जीवाला धोका निर्माण झाला आहे.
अहमदनगरमध्ये ऑक्सिजनचे उत्पादन करणारा प्रकल्प नाही. द्रव स्वरुपातून गॅस स्वरुपात ऑक्सिजन तयार करणारे सर्व प्रकल्प पुणे, मुंबई व चाकण येथे आहेत.
तेथे तयार झालेल्या ऑक्सिजनचा पुरवठा नगरला केला जातो. नगरमध्ये तीन ते चार प्रकल्प आहेत की जे तो ऑक्सिजन सिलेंडरमध्ये भरून जिल्हा रुग्णालय किंवा खासगी रुग्णालयाना पुरवठा केला जातो.
तसेच पुणे, मुंबई आणि चाकण.येथून येणारा ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्याने प्रशासनाचीही धावपळ उडत आहे. जिल्हा रुग्णालयात रोज मोठे व छोटे सिलेंडरची मागणी 80 ते 100 होती.
ती मागणीही आता दुप्पट झाली आहे. रोज कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने सिलेंडरलाही मागणी वाढत असून तेवढी उपलब्धता नसल्याने पुरवठादारही चिंतेत आहेत.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved