Ahmednagar News : जामखेड तालुक्यातील कडभनवाडी येथील ग्रामदैवत श्री साकेश्वर महाराजांचा चांदीचा मुकुट अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा चोरून नेल्याची घटना सोमवारी सकाळी११वाजण्याच्या सुमारास घडली आहे.यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
तालुक्यातील साकेश्वर महाराज जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. मंदिरात देवाच्या मुर्तीवर चांदीचा मुकुट बसवलेला होता. सोमवारी सकाळी देवाचे भक्त नामदेव कडभने यांनी मंदिराची स्वच्छता करून मुकुट स्वच्छ केला.
नंतर कडभने घरी गेले आणि परत एक तासानी परत आले असता चांदीचा मुकुट नव्हता. मुकुट चोरीला गेल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दारूच्या नशेत कोणीतरी हे कृत्य केले असावे असा अंदाज व्यक्त केला जात आहे. चोरट्यांनी आता आपला मोर्चा देवस्थान सारख्या पवित्र ठिकाणी वळवला असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.