अहमदनगर बातम्या

… साहेब आमचा प्रशासनावर भरोसा नाय…! गावकऱ्यांची आमदारासमोर मांडली कैफियत

Ahmednagar News : साहेब आता आमचा प्रशासनावर भरवसा राहिला नाही. फक्त तुमच्यावरच आमचा भरोसा आहे. अशी भावना नेवासा तालुक्यातील घोगरगावातील गावकऱ्यांनी तहसीलदार व पोलिस अधिकाऱ्यांसमोर व्यक्त केली.

वाळू तस्करीला विरोध केल्यामुळे वाळूतस्करांनी घोगरगावातील गावकऱ्यांवर हल्ला केल्याच्या पार्श्वभूमीवर वाळूतस्करांमुळे गावात भीतीचे वातावरण असून, गावकरी दहशतीखाली आहेत. महसूल व पोलिसांकडे अनेकदा लेखी तक्रारी करूनही गावकऱ्यांना प्रतिसाद भेटत नाही.

आ. गडाख यांनी आज गावात येत धीर दिला. यावेळी गावकऱ्यांनी आ. गडाख यांच्यासमोरच साहेब आता आमचा प्रशासनावर भरवसा राहिला नाही. फक्त तुमच्यावरच आमचा भरोसा आहे. अशी भावना व्यक्त केल्या.

यावेळी आ. गडाख म्हणाले की, तालुक्याबाहेरील लोक तालुक्यात येऊन दहशत करत आहेत. वाळू तस्करांच्या वाहनांमुळे मुलांना शाळेत जाणेही मुश्किल झाले आहे. अधिकारी गावकऱ्यांना जुमानत नाहीत. तस्कर गावकऱ्यांवर हल्ला करतात, हे सहन करणार नाही.

दोन दिवसांत वाळूउपसा बंद करा. एकाही नागरिकाच्या केसाला धक्का लागला, तर कुणाचीही गय करणार नाही.असा इशारा दिला.

वाळू तस्करीला विरोध केल्यामुळे वाळूतस्करांनी गावकऱ्यांवर हल्ला केल्याच्या पार्श्वभूमीवर आ. शंकरराव गडाख आक्रमक झाले. शनिवारी तहसीलदारांना सोबत घेत ते थेट वाळूचोरी होत असलेल्या घोगरगावच्या नदीपात्रात पोहोचले. गावकऱ्यांना मारहाण झाल्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी आ. गडाखांनी केली.

घोगरगावातील गावकऱ्यांसह आ. गडाख नेवासे येथे तहसील कार्यालयात पोहोचले. उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने आ. गडाख तहसीलदारांना सोबत घेत घोगरगावात पोहोचले.

तेथे त्यांना वाळूचोरीचे ठिकाण दाखविले. प्रशासनाकडे तक्रार करूनही कारवाई होत नाही. महसूल, पोलिस व तस्करांचे लागेबांधे असल्याचा आरोप गावकऱ्यांनी या वेळी केला. गावकऱ्यांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करावी; अन्यथा उपोषणाचा इशारा गावकऱ्यांनी दिला.

 

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts