Ahmednagar News : कोरोनाच्या काळात अडचणीत आलेल्या शिर्डीच्या साईबाबा संस्थानची परिस्थिती पुन्हा पूर्वपदावर येत आहे. भाविकांचा ओढा आणि देगण्यांचे प्रमाणही वाढले आहे.
गेल्या सात महिन्यांत ६४ लाख भाविकांनी शिर्डीत येऊन दर्शन घेतले असून त्यांच्या माध्यमातून १८८ कोटी रुपयांची देणगी मिळाली आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली.
कोरोना काळात मंदीर बंद होते. त्यानंतर ते सुरू झाले. ७ ऑक्टोबर २०२१ ते ३१ मे २०२२ या सात महिन्यांच्या कालावधीत तब्बल १८८ कोटी ५५ लाख रुपये संस्थानच्या तिजोरीत जमा झाले आहेत. सात महिन्यातच ६४ लाख भाविकांनी शिर्डीला येवून साईबाबा समाधीचे दर्शन घेतले आहे. मधल्या काळात मंदावलेले व्यावसायांतही पुन्हा तेजी आली आहे.