अहमदनगर बातम्या

Rohit Pawar : ‘ काहीजण’ मी मंजूर केलेल्या कामांना स्थगिती देत आहेत अन…

Ahmednagar News:पाणंद रस्ते ग्रामस्थांसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. आजपर्यंत लोकांनी व शेतकऱ्यांनी सहकार्य केलं त्याचबरोबर बीडीओ, ग्रामसेवक, ग्रामविकासचे सर्व अधिकारी, महसूलचे अधिकारी या सर्वांनी सहकार्य केले आहे.

म्हणून १ लाख ८० हजार सामान्य लोकांना आपण न्याय देऊ शकलो. काही लोक वेगळ्या प्रकारे यामध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न करत आहेत आणि मी मंजूर केलेली कामे यांना स्थगिती देऊन ती त्यांनी केली, असं दाखवण्याचा प्रयत्न करत आहे.

परंतु लोकांना सर्व गोष्टी माहिती असतात. असे सांगत आमदार रोहित पवार यांनी आमदार राम शिंदे यांचे नाव न घेता टीका केली. कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार पवार यांनी नुकतीच रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे यांची भेट घेतली.

मतदारसंघातील प्रलंबित शेत पाणंद रस्त्यांची कामे मार्गी लागावी याबाबत या भेटीमध्ये चर्चा झाली. दरम्यान, कर्जत-जामखेड मतदारसंघात गेल्या दोन वर्षात आमदार पवार यांच्या माध्यमातून पहिल्या ३ टप्प्यात दीड हजार किलोमीटरहून अधिक लांबीचे पाणंद रस्त्यांचे काम पूर्ण झाले आहे.

अशातच चौथ्या टप्प्यातील प्रत्येक गावामध्ये ४ ते ५ रस्ते शेतकऱ्यांच्या व ग्रामस्थांच्या मागणीनुसार आमदार रोहित पवार यांच्याकडून प्रस्तावित केले होते. त्याला जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता दिल्यानंतर त्या-त्या संबंधित ग्रामपंचायतीला वर्क ऑर्डरचे वितरण देखील करण्यात आले होते.

यामध्ये चौथ्या टप्प्यात १६३१ किमीच्या ९३७ कामांचा समावेश आहे. या कामासाठी लागणारा निधी उपलब्ध करण्याबाबतची मागणी आमदार पवार यांनी मंत्री महोदयांना भेटून केली आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts