अहमदनगर बातम्या

Ahmednagar News : आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी सोनईत निषेध मोर्चा

Ahmednagar News : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी येथील हिंदू समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर दुग्धा अभिषेक करून आरोपीला कडक कारवाईच्या मागणीसाठी पोलीस ठाण्यावर काल मंगळवारी निषेध मोर्चा काढण्यात आला होता.

यावेळी सोनईतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास सरपंच धनंजय वाघ यांच्या हस्ते मंत्रोच्चारात दुग्धा अभिषेक करण्यात येऊन सोनई पोलीस ठाण्यावर सकल हिंदू समाजाच्या वतीने छ. संभाजी महाराज चौक, महावीर मार्ग, आंबेडकर चौक, बसस्थानक मार्गे निषेध मोर्चा काढून सोनई पोलिसांना निवेदन देण्यात आले.

याप्रसंगी पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र थोरात यांनी निवेदन स्वीकारले व आपल्या भावना वरिष्ठांना कळवले जाईल, असे सांगितले.

दरम्यान, देशाचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी नगर येथील यवकाने बेताल व आक्षेपार्ह वक्तव्य करून सोशल मीडियावर ऑडिओ क्लिप प्रसारित केल्याने हिंदू समाजाच्या भावना दुखण्याचे काम केले आहे.

त्यामुळे शासनाने त्या यवकावर देशद्रोहाचा खटला दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी सरपंच धनंजय वाघ, महेश दरंदले, संदिप लांडे, संदिप कुसळकर यांनी व्यक्त केली. यावेळी मोठ्या प्रमाणावर यवक उपस्थित होते.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts