अहमदनगर बातम्या

श्रीरामपूर- कोपरगाव रस्त्यावर भरधाव कारला अपघात

Ahmednagar News : श्रीरामपूर- कोपरगाव रस्त्यावर खैरीनिमगाव- गोंडेगाव शिवारात विस चारी जवळ नियंत्रण सुटल्याने भरधाव कारचा अपघात झाला. काल रविवारी दुपारच्या दरम्यान हा अपघात झाला. त्यात तिन जण जखमी झाले असून किरण संजय मुठे, उद्धव आण्णासाहेब मुठे, आणी तानाजी दिघे अशी त्यांची नावे आहे.

दरम्यान, त्यांना उपचारासाठी लोणी येथील प्रवरा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पुणतांब्याहून श्रीरामपूरच्या दिशेने जात असलेली भरधाव कार रस्त्यावर पडलेल्या वाळूवर घसरुन रस्त्यावरच पलटली झाली. त्यात कारचे मोठे नुकसान झाले आहे.

चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची शक्यता वर्तविली जात असली, तरी देखील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाळू पडलेली असल्याने हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शीकडून समजले.

दरम्यान, राज्य सरकारचे वाळू तस्करांवर कुठलेही नियंत्रण नसल्याने त्याचा मनस्ताप सर्वसामान्यांना होत आहे. अपघात घडल्यानंतर जखमींना सर्वप्रथम श्रीरामपूर येथे आणि त्यानंतर लोणी येथे उपचारास हलवण्यात आले आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts