अहमदनगर बातम्या

Ahmednagar News : वीज उपकेंद्र सुरू करणे म्हणजे केवळ स्टंटबाजी !

Ahmednagar News : वावरथ जांभळी परिसरातील शेतकऱ्यांची उभी पिके वीजपुरवठा सातत्याने खंडीत होत असल्याने जळून गेली आहेत. हे लक्षात घेता येथील नवीन वीज उपकेंद्राचे उद्घाटन जेव्हा व्हायचे तेव्हा होवो; पण कोणतेही राजकारण न करता, फोटोसेशन न करता हे उपकेंद्र सुरू करण्याची भूमिका सर्व ग्रामस्थांची होती.

असे असताना नेत्यांच्या सूचनेनुसार उपकेंद्र सुरू असे म्हणणे म्हणजे फक्त राजकीय स्टंटबाजी असल्याचे जांभळीचे माजी सरपंच व बाजार समितीचे संचालक रामदास बाचकर यांनी म्हटले आहे.

बाचकर यांनी पत्रकात म्हटले, की जांभळी येथील वीज उपकेंद्रासाठी तांत्रिक मंजूरीपासून कार्यारंभ आदेश, फॉरेस्ट विभाग, पाटबंधारे विभाग यांच्या मंजुरी ही सर्व कामे तत्कालीन ऊर्जा राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या प्रयत्नाने झाली.

जांभळी किंवा वावरथ परीसरातील शेतकरी कुठल्याही नेत्याकडे सबस्टेशन चालु करा म्हणून गेले नव्हते. आम्ही दोन्ही गावांतील काही ग्रामस्थ महावतरणचे कार्यकारी अभियंता व उपअभियंता राहुरी यांना विनंती केली, की आपण उपकेंद्राचे उदघाटन कधीही करा; परंतु आमची पिके पावसाअभावी जळू लागली आहेत.

जुन्या विद्युत लाइनचा वीजपुरवठा वारंवार खंडीत होत असल्याने नवीन सबस्टेशनमधून तात्पुरती वीजजोडणी करून द्यावी. ही बाब फक्त जांभळी व वावरथ येथील ग्रामस्थ आणि अधिकाऱ्यांमध्ये ठरली व यात कुठल्याही प्रकारचे फोटोसेशन व राजकारण करायचे नाही,

असं सर्वानुमताने ठरले असताना गावातील काही विघ्नसंतोषी लोकांनी यात राजकारण आणण्याचे काम केले. ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. वास्तविक आमदार तनपुरे यांनी जांभळी वीज उपकेंद्राबरोबर तालुक्यातील व मतदारसंघातील विजेचे प्रश्न महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर असताना त्या अडीच वर्षात ऊर्जा राज्यमंत्री म्हणून मार्गी लावले.

सबटेशनचे काम पंधरा दिवसांत पूर्ण करून लवकरात लवकर आमदार तनपुरे यांच्या हस्ते कामाचे जाहीर उदघाटन करणार असल्याचे रामदास बाचकर व वावरथचे सरपंच ज्ञानेश्वर बाचकर, जांभळीचे सरपंच अस्मा शौकत शेख, चेअरमन गंगाधर जाधव, ग्रामपंचायत सदस्य धोंडीभाऊ बाचकर, दगडु बाचकर, जयराम माने, सुरेश कावळे, शिवाजी माळी, रफिक शेख आदींनी केले.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts