Ahmednagar Politics News :- विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून एडी, सीबीआय, एनआयबी, अशा केंद्रीय यंत्रणेचा मोठ्या प्रमाणात गैरवापर करुन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची इडी कडून चौकशी केली असल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निषेध व्यक्त करत
निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र कुमार पाटील यांना निवेदन देताना जिल्हाअध्यक्ष राजेंद्र फाळके समवेत जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, अंबादास गारुडकर, अशोकराव बाबर, किसनराव लोटके, बाबासाहेब तरटे, रोहिदास कर्डिले, सिताराम काकडे, प्रकाश पोटे, केशव बेरड, आरिफ शेख, फारूक रंगरेज, गजानन भांडवलकर, वैभव महस्के, रत्नाकर ठाणगे आदीसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की एडी, सीबीआय, एनआयबी, अशा केंद्रीय यंत्रणाचा दुरुपयोग विरोधी पक्षाची मुस्काडदाबी करण्यासाठी सत्ताधारी हे करत असून. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची इडी कडून चौकशी करण्यात आली असून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटीपेक्षा जास्त मोठा भ्रष्टाचाराचा खटला ठेवला गेला व त्यांना १३ महिने तुरुंगात ठेवण्यात आले मात्र चौकशीत हे सत्य नसल्याचे निष्पन्न झाले
तसेच माजी मंत्री नवाब मलिक यांनाही त्यांनी काही चुकीच्या गोष्टी लोकांसमोर आणल्या म्हणून तुरुंगात दाबण्यात आले व ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्या जावयाला अटक करण्यात आली असून जिल्ह्याचे माजी पालकमंत्री ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांच्या मागेही चौकशी लावण्यात आली.
सत्ताधारी हे या यंत्रणाचा गैरवापर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाहीतर अन्य विरोधी पक्षातील नेत्यांबाबत ही सुरू आहे. साम. दाम. दंड. भेद कोणत्याही मार्ग सत्ता मिळवण्यासाठी भाजप हे कृत्य राज्यात सुरू आहे तसेच हे कृत्य संपूर्ण देशाने पाहिले आहेत. फोडाफोडीचे राजकारण करून आणि आमदार पळून राज्यामधील सरकार पाडण्याचे असल्याचे प्रयोग सुरू असून महाराष्ट्र राज्यात तर आता खोके सरकार अशी संघाच्या सरकारची ओळख झाली आहे.
विरोधकांना संपवण्याचे असे विध्वसात्मक राजकारण देशाच्या व राज्याच्या हिताचे नाही कर्नाटक मध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये अशा राजकारणाला जनतेने नाकारल्याचे दिसून आले असून हे चित्र आगामी काळात देशात व महाराष्ट्रात ही दिसणार असल्याचे निवेदनात म्हंटले असून विरोधकांवर सुरू असलेल्या दबाव तंत्राचा जाहीर निषेध व्यक्त करत निवेदन देण्यात आले