अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2020 :-स्वच्छतेसाठी नेहमी पुढाकार घेत असलेला नगर जिल्ह्याची ख्याती राज्यात आहे. नगर शहरात देखील स्वच्छतेच्या मोहिमेला नेहमीच सकारात्मक प्रतिसाद मिळत असतो.
मात्र गेल्या काही दिवसांपाससून शहराचे विद्रुपीकरण होऊ लागले आहे. ठिकठिकाणी साचणार कचरा, तसेच शहरात ठिकठिकाणी बांधकामाच्या टाकाऊ राडारोड्याचे / डेब्रिजचे अस्ताव्यतपणे पडलेले ढिगारे दिसून येत आहे.
या वाढत्या ढिगाऱ्यांमुळे आता अनेक नागरी समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत, तसेच यामुळे शहराचे विद्रुपीकरणमाध्ये भर पडत आहे.
स्वच्छ सुंदर शहराचे असे असे वाढते विद्रुपीकरण थांबावे यासाठी नगर शहरात डेब्रिज / बांधकामाच्या टाकाऊ राडारोड्याचे व्यवस्थापन करण्यात यावे,
अशी मागणी हरिभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभय ललवाणी यांनी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, डेब्रिज टाकण्यासाठी शहरात विविध भागात डेब्रिज डम्पींग ग्राऊंड तयार करण्यात यावेत.
तेथे त्याचे विलगीकरण करुन दगड, डबर, मुरूम, माती वेगवेगळे साठविण्यात यावेत. तसेच गरजेनुसार त्याचा पुनर्वापर करण्यात यावा.
तसेच स्वच्छ सर्वेक्षण 2021 चा एक भाग म्हणून याबाबत धोरण निश्चित करण्यात यावे, अशी मागणी अभय ललवाणी यांनी केली आहे.