अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- भिंगार शहराला गेल्या कित्येक दिवसापासून ए एम टी बस सेवा नव्हती त्यामुळे भिंगार मधील नागरिकांना नगर शहरांमध्ये येताना व जाताना अडचणींना सामोरे जावे लागत होते.
त्यामुळे विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक व महिलांना त्याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत होता त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भिंगार शहर अध्यक्ष सागर चाबुकस्वार व पदाधिकाऱ्यांनी 20 डिसेंबर रोजी महानगरपालिका उपायुक्त सुनिल पवार यांना निवेदन दिले होते त्यांची दखल घेत 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी भिंगार शहरात बस चालू करण्यात आली आहे.
वंचित बहुजन आघाडीचे भिंगार शहर अध्यक्ष सागर चाबुकस्वार समवेत संतोष धिवर, नागेश पाथरीया, जि.प.सदस्य शरद झोडगे, बाळासाहेब पतके, प्रकाश लूनिया, अच्युत गाडे, राजेश कडूस, पठाण साहेब व भिंगार मधील नागरिकांच्या वतीने ए एम टी बस सेवेचे व्यवस्थापक रावसाहेब काकडे,
वाहतूक अधिकारी सुभाष पठाडे, गणेश कचरे यांचा सत्कार करून भिंगार शहरांमध्ये स्वागत करण्यात आले या बससेवेच्या माध्यमाने नागरिकांची रिक्षा वाल्यांकडून होणारी लूट थांबून महानगर पालिकेच्या उत्पन्नात देखील वाढ होईल त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष सागर चाबुकस्वार व पदाधिकाऱ्यांचे नागरिकांकडून अभिनंदन करण्यात आले.