अहमदनगर बातम्या

Dr. Sujay Vikhe : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात केंद्र सरकारच्या विविध योजना यशस्वीपणे राबविल्या

Dr. Sujay Vikhe : जनतेच्या आशीर्वादाने ५० वर्षाच्या राजकीय, सामाजिक कारकिर्दीत विखे पाटील कुटुंबाला काम करण्याची संधी मिळाली आहे. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात केंद्र सरकारच्या विविध योजना यशस्वीपणे राबविल्या आहेत.

याचबरोबर नगर शहराच्या विकासाला गती देत बायपास रस्त्याचे कामे पूर्णत्वाकडे आली असून शहराच्या विस्तारीकरणाला चालना मिळणार आहे. नगरकरांचे उड्डाणपूलाचे स्वप्न देखील पूर्ण केले आहे.

येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्या येथे श्री राम मंदिराचा लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. तरी आपण सर्वांनी हा धार्मिकतेचा दिवस उत्साहात संपन्न करूया, असे प्रतिपादन खा. डॉ. सुजय विखे यांनी केले.

बालिकाश्रम रोड येथे विविध विकास कामाचे उद्घाटन खा. विखे यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी महापौर बाबासाहेब वाकळे, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर, माजी नगरसेवक रवींद्र बारस्कर,

माजी नगरसेविका वंदनाताई ताठे, माजी नगरसेविका पल्लवी जाधव, विलास ताठे, विवेक नाईक, बाळासाहेब गायकवाड, भाजपच्या महिला जिल्हाध्यक्ष प्रिया जानवे, मनोज ताठे, नितीन शेलार, अनिल ढवण, किशोर वाकळे, बाबासाहेब सानप आदी उपस्थित होते.

अभय आगरकर म्हणाले की विकास कामाबरोबरच धार्मिकतेचे काम उभे करण्याचे काम खासदार विखे पाटील यांनी केले आहे. नगर शहरातील महिलांचे देवदर्शन घडविण्याचे काम केले आहे विखे पाटील कुटुंबियांकडे समाजाला देण्यासाठीचे दायित्व खूप मोठे आहे.

माजी नगरसेविका वंदना ताठे म्हणाल्या की, आपल्या शहराला सुसंस्कृत खासदार लाभले आहेत. त्यांच्या माध्यमातून प्रभाग सहाच्या विकासाला गती मिळाली आहे. यावेळी माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन माजी नगरसेवक रवींद्र बारस्कर यांनी केले.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts