अहमदनगर बातम्या

सुमन काळे हत्याकांड: परिवारास मिळाली येवढ्या लाखांची मदत

अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2021 :- भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी पीडित सुमन काळे प्रकरणात त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर खडबडून जाग आलेल्या प्रशासनाने पीडितेच्या परिवाराला न्यायालयाच्या आदेशाने जी मदत 1 वर्षांपूर्वी देणे अपेक्षीत होते ती तातडीने देऊ केली.(Suman Kale massacre)

 

याविषयी माहिती देताना भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांनी सांगितले, सुमन काळे हत्या प्रकरण अजूनही न्यायालयीन प्रक्रियेत आहे.

या खटल्या संदर्भात न्यायालयाने राज्य सरकारला रूपये पाच लाख भरपाई म्हणून काळे परिवाराला द्यावेत, असा आदेश देऊनही त्याची अंमलबजावणी अद्यापपर्यंत झाली नव्हती.

याबाबत पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ यांच्या निदर्शनास आणून दिल्यावर त्यांनी गेले काही दिवस याचा अनेक पातळ्यांवर काळजीपूर्वक पाठपुरावा केला.

त्याची परिणीती म्हणजे, आज अखेर राज्य शासनाने पाच लाख रुपयांचा धनादेश सुमन काळे यांच्या कुटुंबियांना प्रदान केला आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office