अहमदनगर बातम्या

स्वदेशी आयएनएस विक्रांत नौदलात दाखल, पहिला कमांडिंग ऑफिसर अहमदनगरचा

Ahmednagar News:स्वदेशी बनावटीची विमानवाहू युद्ध नौका आयएनएस विक्रांत ही नौदलात दाखल झाली आहे. हा जस भारतीय नौदलासाठी आज गौरवाचा दिवस आहे.

तसाच अहमदनगरकरांसाठीही आहे. या स्वदेशी विमानवाहू नौकेचा पहिला कमांडिंग ऑफिसर कमोडोओर विद्याधर हारके हे मूळचे अहमदनगरचे आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत केरळमधील कोची येथे या नौकेचे जलावतरण झाले. नौदलाचा नवा झेंडा छत्रपती शिवरायांना समर्पित करण्याची घोषणा यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

त्यामुळे महाराष्ट्राचा गौरव होत असताना अहमदनगरचाही गौरव झाला. या स्वदेशी विमानवाहू नौकेचा पहिले कमांडिंग ऑफिसर हारके मुळचे अहमदनगरचे असून सध्या पुण्यात स्थायिक झालेले आहेत.

या युद्ध नौकेचे पहिले कमांडिंग ऑफिसर होण्याचा मान त्यांना मिळाला. विद्याधर हारके यांना नौदलाच्या अनेक मोठ्या युद्ध नौकांचे नेतृत्व केले आहे.

त्यांनी लँडिंग प्लॅटफॉर्म डॉक आयएनएस जलश्वाचे नेतृत्व केले आहे. आयएनएस विक्रांतची धुरा हाती घेण्याच्या आधी ते ईस्टर्न फ्लीटचे फ्लीट ऑपरेशन्स ऑफिसर होते.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts