अहमदनगर बातम्या

बीड-अहमदनगर मार्गावर भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू !

बीडमधील महामार्गावर दोन भीषण अपघात झाल्याचे वृत्त आले आहे. या अपघातामध्ये १० जणांचा मृ्त्यू झाला असल्याचे समजते. पहिला अपघात अॅम्बुलन्सला झाला आहे. ही अॅम्बुलन्स बीडहून अहमदनगरकडे चालली होती. यात डॉक्टरसह ४ जणांचा मृत्यू झाला आहे.

तर दुसरा अपघात ट्रॅव्हल्सला झाला आहे. ट्रव्हल्स उलटून एकूण ६ प्रवाशांचा मृत्यू झालाय. ही ट्रॅव्हल्स मुंबईहून बीडकडे निघाली होती. या दोन अपघातात १० जणांचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील अंभोरा हद्दीतील दोलावडगाव येथे भरधाव वेगाने येणाऱ्या रुग्णवाहिकेने ट्रकला पाठीमागून धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, त्यात चार जण मृत्यू पावले.

भरत सीताराम लोखंडे (वय ३५), मनोज पांगू तिरपुडे (वय ३५), पप्पू पांगू तिरखुंडे (वय ३५) अशी मृतांची नावे आहेत. राजेश बाबासाहेब झिंजुरके (वय ३५) यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

ज्ञानदेव सूर्यभान घुमरे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अहमदनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुसरीकडे मुंबईहून बीडकडे जाणाऱ्या बसला अपघात झाला. ही सागर ट्रॅव्हल्सचे बस होती.

बसचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचा अंदाज आहे. आष्टी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आष्टा फाट्याजवळ हा अपघात झाला. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts