अहमदनगर Live24 टीम, 17 फेब्रुवारी 2022 :- नेवासा तालुक्यातील भेंडा येथील भेंडा-जेऊर रस्तावरील गरडवस्ती जवळ ऊसाने भरलेली बैलगाडी घसरल्याने चारीच्या पाण्यात बुडून एका बैलाचा मृत्यू झाला आहे.
अधिक माहिती अशी, सध्या मुळा उजवा कालव्याचे पाण्याने बंधारे भरण्यासाठी रस्त्यावरून पाणी सोडल्याने बुधवारी रात्रीच्या सुमारास ज्ञानेश्वर कारखान्यास ऊस वाहतूक करणारे शिवाजी गणपत हंडाळ रा. पाचुंदा, ता. नेवासा या ऊसतोडणी कामगाराची ऊसाने भरलेली टायरबैल गाडी घेऊन चालले होते.
कारखान्याकडे ऊस घेऊन आठ ते दहा टायर बैलगाड्या चालल्या असता एक टायरगाडी घसरुन चरात गेली, चरातील पाण्यात पडलेल्या बैलाला मोकळा करेपर्यंत काही अवधी वाया गेला आणि जे होऊ नाहीच तेच झाले. आणि काही क्षणातच बैलाने जीव सोडला.