घरीच झेंडावंदन करुन मुलांचा आनंद केला द्विगुणित

अहमदनगर Live24 टीम,16 ऑगस्ट 2020 :-  कोरोनामुळे लॉकडाऊनच्या काळात शाळा बंद असल्या कारणाने मुलांना व पालकांना झेंडा वंदनासाठी शाळेत उपस्थित राहता येत नसल्याने मुलं नाराज होती.

परंतु भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलचे शिक्षक सतीश गुगळे यांनी आपल्या बुरुडगांव रोडवरील इको फ्रेंडली बांबू हाऊसच्या गार्डनमध्ये परिवारातील सदस्यांसह परिसरातील बालाचमुंसहा झेंड्याचे पूजन करुन झेंडावंदन करुन मोठ्या उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा केला.

त्यामुळे मुलांचा आनंद द्विगुणित झाला. आदल्या दिवशीपासूनच मुलांनी परिसराची स्वच्छता करुन तयारी केली. सकाळी नवीन कपडे घालून उपस्थित होते.

त्याचबरोबर परिवारातील सदस्यांनीही घरी होत असलेल्या झेंडावंदनात अभिमानाने सहभागी झाले. भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलचे शिक्षक सतीश गुगळे यांनी यावेळी उपस्थितांना भारताच्या तिरंगी झेंड्या विषयी व ऐतिहासिक अहमदनगर शहराच्या भुईकोट किल्लयातील स्वातंत्र्य चळवळीतील घटनांना उजाळा दिला.

या कार्यक्रमासाठी श्रीमती पुष्पा गुगळे, सौ.सारिका गुगळे, चि. स्वराज्य गुगळे, चि.दर्पण गुगळे, परिसरातील नागरिक विनय गांधी, प्रमोद गांधी, आनंद गांधी, सौ.उर्मिला गावडे, सौ.अंजू शर्मा,

रविंद्र शर्मा, चि.पार्श्‍व चोरडिया, चि.प्रीत चोरडिया, कु.विदिषा गुगळे, कु.हिरल गांधी, कु.मीनाक्षी गांधी उपस्थित होते. सर्व उपस्थितांना स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने खाऊचे वाटप करण्यात आले.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts