अहमदनगर बातम्या

खरेदी-विक्री’च्या संकुलास मिळणार डॉ. तनपुरेंचे नाव

Ahmednagar News : राहुरी तालुका खरेदी-विक्री संघाने नगर-मनमाड राज्य मार्गांवर बांधलेल्या व्यापारी संकुलास डॉ. कै. दादासाहेब तनपुरे व्यापारी संकुल असे नाव देण्याचा ठराव संस्थेच्या ६८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत एकमताने मंजूर करण्यात आल्याची माहिती संस्थेचे चेअरमन युवराज सुधाकर तनपुरे यांनी दिली.

राहुरी तालुका खरेदी-विक्री संघाची ६८वी वार्षिक सर्व साधारण सभा संस्थेच्या कार्यालयात चेअरमन युवराज तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली होऊन तीत वरील ठराव मंजूर करण्यात आला.

यावेळी संस्थेचे मार्गदर्शक माजी चेअरमन सुधाकर बाबुराव तनपुरे, व्हॉइस चेअरमन संतोष पानसंबळ, ज्येष्ठ संचालक अप्पासाहेब कोहकडे, विष्णू तारडे, ज्ञानदेव हारदे, सखाराम कुमकर, आबासाहेब वाघमारे, संतोष खाडे, बाळकृष्ण पवार, संतोष तनपुरे, दत्तात्रय गडाख, अनिल शिंदे, सुभाष डुक्रे, रावसाहेब शेळके, मनोज लहारे आदी संचालक उपस्थित होते.

युवराज तनपुरे म्हणाले की, अहवाल सालात संस्थेकडे १ कोटी ४ लाख रुपयाच्या ठेवी असून शासनाच्या हमी भाव योजनेतर्गत १४५७ क्विंटल माल खरेदी केला आहे. त्यापोटी संस्थेने शेतकऱ्यांच्या खात्यावर ७० लाख रुपयाचे पेमेंट वर्ग केले आहे.

अहवाल सालात संस्थेने सभासद शेतकऱ्यांसाठी ११० टन खतांची खरेदी करून १०३ टन खताची विक्री केली आहे. खते उपलब्ध करून दिली असून त्यापोटी संस्थेस ९ लाख ६६ हजार रुपये नफा झाला. संस्थेने कार्यक्षेत्रात बांधलेल्या व्यापारी संकुलाचे मूल्यांकन १ कोटी ५६ लाख रुपये आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts