अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2021 :- पर्यावरण संवर्धनासाठी एक व्यक्ती, एक झाड ही संकल्पना सर्वांनी राबवावी. प्रत्येक कुटुंबातील सदस्यांनी किमान एक तरी झाड लावून त्याचे संगोपन केले पाहिजे.
निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्षरोपण व संवर्धनाशिवाय पर्याय राहिला नसल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. भानुदास होले यांनी केले. सावेडी उपनगरातील गुलमोहर रोड येथे आयोजित वृक्षरोपण अभियानाच्या उद्घाटनाप्रसंगी अॅड. होले बोलत होते.
यावेळी जय युवाचे अॅड. महेश शिंदे, आधारवडच्या अध्यक्षा अॅड.अनिता दिघे, अॅड.पुष्पा जेजुरकर, अॅड.गौरी सामलेटी, अॅड.सुनिल तोडकर, पोपटराव बनकर, सागर अलचेट्टी, आरती शिंदे, रजनी ताठे, आदिती उंडे, किरण सातपुते आदी उपस्थित होते.
अॅड. महेश शिंदे म्हणाले की, मानवाने निसर्गावर अतिक्रमण करुन त्याचे समतोल बिघडवले आहे. हल्ली ऋतू देखील बदलले असून, याला मनुष्य जबाबदार आहे. जंगलाची कत्तल करण्यात आल्याने जंगली प्राणी मनुष्य वस्तीत आढळत आहे. प्रत्येकाने निसर्गाचे समतोल साधण्यासाठी एक तरी झाड लावण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
अॅड. होले यांच्या संकल्पनेतून वृक्षरोपण अभियान राबविण्यात आले. यावेळी विशेषत: देशी जातीचे व नारळाच्या झाडांचे रोपण करण्यात आले. कार्यक्रमाचे संयोजन सागर अलचेट्टी यांनी केले. आभार अॅड.अनिता दिघे यांनी मानले.