अहमदनगर : साध्य साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू आहे. दरम्यान ऊस तोडणी करण्यासाठी अनेक मजूर लागत असतात. तसेच साखर कारखान्यांना ऊस तोडणी मजूर पुरवणारे काहीजण देखील आहेत.
मात्र श्रीगोंदा तालुक्यात नेमका याच्या उलट प्रकार घडला आहे. तो असा श्रीगोंदा तालुक्यातील साखर कारखान्यांना ऊस तोडणी मजूर पुरविण्याचे कबूल करत ४२ लाख २५ हजार रुपये घेऊन गेले पण ऊस तोडणीसाठी मजूर न देता कारखान्यास ४२ लाखांचा चुना लावला आहे.
संतोष सिताराम पवार, सुभाष ठाकूरसिंग वंजारी, धनसिंग राठोड (तिघे रा.पाचोरा जि.जळगाव) असे त्या ठेकेदारांची नावे आहेत.
या बाबतअधिक माहिती अशी, पिंपळगाव पिसा येथील ऊस तोडणी तसेच वाहतूक व्यवसाय करणारे किरण प्रकाश सरोदे तसेच इतर इसमंकडून सन २०२२ – २३ मध्ये पिंपळगाव पिसा येथील कुकडी सहकारी साखर कारखान्याच्या गाळप हंगामा करिता उस तोडणी मजूर पुरविण्याची जबाबदारी घेत, त्यांच्याकडून वेळोवेळी ४२ लाख २५ हजार रुपये उचल घेतले.
परंतु गाळप हंगामासाठी ऊस तोडणी मजूर न देता त्यांची फसवणूक केली. या प्रकरणी बेलवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून वरील तिघांना अटक करण्यात आली आहे.