अहमदनगर Live24 टीम, 14 मे 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता प्रशासनाने लसीकरण मोहीम हाती घेतली होती. यातच नागरिकांचा मोठा प्रतिसाद व लसीचा अत्यल्प पुरवठा यामुळे लसीकरण केंद्रांवर गोंधळ उडत होता.
यातच 18 ते 44 वयोगातील लसीकरण स्थगित करण्यात आल्याने लसीकरणासाठीची गर्दी ओसरली मात्र जिल्ह्यात अद्यापही लसीचा तुटवडा कायमच असल्याचे दिसून येत आहे.
राज्य सरकारने 45 वयोगटापुढील नागरिकांना फक्त दुसरा डोस देण्याचा निर्णय घेतल्याने गर्दीही अत्यल्प दिसून आली. मात्र कोव्हॅक्सिनच्या लसीचा तुटवडा जाणवत आहे
त्यामुळे कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस घेण्यासाठी आलेल्या अनेकांचा हिरमोड होत आहे. कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन अशा दोन प्रकारच्या लस दिल्या जात आहेत.
सध्या कोविशिल्ड लस उपलब्ध असल्याने राहाता ग्रामिण रुग्णालयात कोविशिल्डची लस घेण्यासाठी सकाळपासून नगर नागरिकांनी नाव नोंदणी केली.
200 लस उपलब्ध झाल्याने आणि 45 वयोगटाच्या पुढे दुसरा डोस दिला जात असल्याने गर्दीचे प्रमाण अत्यल्प दिसून आले. पहिल्या कोविशिल्डचा डोसला 42 दिवस पूर्ण झालेल्यांना लस देण्यात आली तर त्याहून कमी कालावधी झालेल्यांना विना लस घेता परतावे लागले.
फलकावर तशा सूचना दिल्याने गोंधळ कमी झाला. कोविशिल्डचा दुसरा डोस मिळत असला ्तरी कोव्हॅक्सिनचा डोस मिळत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी दिसून येत आहे. 20 मार्चनंतर डोस घेणार्या नागरिकांना अद्यापही दुसरा डोस मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.