पाणी ही सर्वांचीच प्राथमिक गरज. परंतु अनेकदा शासन हे पाणी पुरवण्यात, शुद्ध पाणी पुरवण्यात अपयशी ठरलेलं दिसत. अहमदनगर जिल्ह्यात या आधी दूषित पाणी पुरवठ्याच्या अनेक घटना समोर आलेल्या आहेत. पंरतु आता जिल्ह्यातील ४९ गावातील पाणीनमुने दूषित आढळले आहेत. यातील सर्वाधिक नगर तालुक्यातील १४ तर पारनेर तालुक्यातील १३ गावांचा समावेश आहे.
जलजन्य आजार पसरण्याचा धोका
पाणी दूषित असेल तर जलजन्य आजार पसरण्याचा धोका असतो. सामान्यतः पाणीपुरवठा ग्रामपंचायतस्तरावर होतो. येथे क्लोरिनचा वापर करून पाण्याचे शुद्धीकरण केले जाते. २० टक्क्यांपेक्षा अधिक क्लोरिनचे प्रमाण असलेल्या टिसीएल पावडरचा वापर पाणीशुद्ध करण्यासाठी केला जातो.
ग्रामस्तरावरील जलसुरक्षक या पाण्याचे नियमीत नमुने घेऊन तपासणीसाठी वरिष्ठ भूवैज्ञानिक व जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवतात. नोव्हेंबरअखेर तपासण्यात आलेल्या अहवालात महिनाभरात ४९ गावांतील जलनमुने दूषित आढळले.
‘ही’ आहे जलनमुने दूषित आढळलेली गावे
अकोले तालुका – शिरपुंजे, वांजुलशेत, पाचनई
जामखेड तालुका – मोहा, राजेवाडी, नान्नज, गुरेवाडी
कोपरगाव तालुका – पडेगाव, रांजणगाव देशमुख
नगर तालुका – आठवड, मदडगाव, निम्बोडी, डोंगरगण, इमामपूर, निमगाव वाघा, ससेवाडी, मजलेचिंचोली, नेप्ती, जखणगाव, हमिदपूर, पोखडर्डी, शेंडी, निंबळक
पारनेर तालुका – कळस, पाडळी आळे, पाबळ, नांदूर पठार, ढवळपुरी, जामगाव, बाबुर्डी, सुपा, शहजापूर, गोरेगाव, माळकूप, वडगाव दर्या, पिंपळगाव तुर्क
राहुरी तालुका – चेडगाव, कुक्कडवेढे
संगमनेर तालुका- आंबी खालसा, तिगाव, निमगाव भोजपूर
श्रीगोंदे तालुका – बेलवंडी, टाकळी लोणार, वेळू
शेवगाव तालुका – कन्हेटाकळी