Ahmednagar News : राज्य सरकारकडे निवेदने, तक्रारी केल्यानंतर सरकारच्या यंत्रणेकडून जसे स्वयंचलित पद्धतीने उत्तर येते, तसेच उत्तर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या पत्रालाही आले आहे.
आपले पत्र पुढील कार्यवाहीसाठी मुख्य सचिवांकडे पाठविल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे.अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून लोकायुक्त कायद्याच्या मसुदा समितीच्या बैठका घेऊन हा कायदा मार्गी लावावा, अशी मागणी केली आहे.
अन्यथा उपोषण करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.हजारे यांचे हे पत्र राज्याच्या मुख्य सचिवांकडे विचारार्थ पाठविण्यात आल्याचे त्यांना कळविण्यात आले आहे. लोकायुक्त कायदा मसुदा समितीचे मुख्य सचिव अध्यक्ष आहेत,
त्यामुळे समितीची बैठक बोलाविण्यासंबंधी तेच निर्णय घेणार असल्याचे कळविण्यात आले आहे. याशिवाय अन्य कोणीही हजारे यांच्याशी अद्याप संपर्क केलेला नाही. हजारे यांच्याकडूनही त्यासाठी विशिष्ट मुदत देण्यात आलेली नाही.