अहमदनगर बातम्या

विहिरीत पडलेला बिबट्या शिडी चढून वर आला, पण…

अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2022 Ahmednagar News :-नगर तालुक्यातील उदरमल शिवारात विहिरीत पडलेल्या बिबट्याला वाचविण्यासाठी वन विभागाच्या बचाव पथकाने मोठे परिश्रम घेतले.

त्याला यश मिळत होते. विहिरीत सोडलेल्या शिडीवर चढून बिबट्या वरपर्यंत आला. मात्र, जमिनीवर पाय टेकण्याआधीच शिडीवरून त्याचा पाय घसरला.

त्यामुळे तो पुन्हा विहिरीत पडला आणि त्याचा मृत्यू झाला. अखेर त्याचा मृतदेहच वर काढण्याची वेळ वन विभागावर आली. उदरमल शिवारात कारभारी पालवे यांच्या विहिरीत बिबट्या पडला होता.

त्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. याची माहित वनविभागाला देण्यात आली. नव विभागाच्या पथकाने तेथे धाव घेतली. बचाव कार्य सुरू झाले. विहिरीत बाज आणि शिडी सोडण्यात आली.

बिबट्याने शिडीचा आधार घेत वर येण्यास सुरवात केली. एक एक पायरी चढत तो वर आला. शेवटच्या टप्प्यावर मात्र त्याचा पाय निसटला. त्यामुळे तो पुन्हा विहिरीत पडला.

त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. पथकातील कर्मचाऱ्यांनी विहिरीत उतरून त्याला बाहेर काढले. नियमानुसार पुढील प्रक्रिया करण्यात आली

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts