नगराध्यक्ष म्हणतात, विखेंच्या मार्गदर्शनाखाली शिर्डीला करणार ‘असं’ काही

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2020 :-  शिर्डीचे साईमंदिर हे भक्तांसाठी अमृततुल्य गोष्ट आहे. साईंचे भक्त जगभर आहेत. या ठिकाणी दर्शनाला येणाऱ्या भक्तांची संख्या अगणित आहे. परंतु सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साई मंदिर बंद आहे.

अशा या शिर्डीला साईबाबा संस्थानच्या सहकार्याने तसेच माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहरांमध्ये देशात प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळविण्यासाठी प्रयत्न करणार

असल्याचे मत शिर्डीच्या नगराध्यक्षा अर्चना कोते यांनी व्यक्त केले. शिर्डीत वर्षाकाठी देशविदेशांतील सुमारे 3 कोटी भाविक शिर्डीत येत असतात.

त्या अनुषंगाने शहरात कचरा मोठ्या प्रमाणात साचतो मात्र नगरपंचायतीच्या माध्यमातून शहर कचरामुक्त करण्यात आले असून शिर्डी नगरपंचायतला दोनवेळा स्वच्छतेचा पुरस्कार मिळवून पंधरा कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले असल्याचेही

त्या म्हणाल्या. नुकताच शिर्डी नगरपंचायतीला स्वच्छ सर्वेक्षण 2020 मध्ये भारतात (वेस्ट ज़ोन) दुसरा क्रमांक व सर्वात स्वच्छ शहर म्हणून प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल

आ. राधाकृष्ण विखे व खा.डॉ.सुजय विखे यांचा सत्कार नगराध्यक्षा अर्चना कोते यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी कोते बोलत होत्या. याप्रसंगी उपनगराध्यक्ष मंगेश त्रिभुवन, मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts