अहमदनगर Live24 टीम, 05 फेब्रुवारी 2021:- पोलिसांच्या तपासासाठी सीसीटीव्ही व मोबाईल ही साधने अत्यंत महत्वाची ठरत आहेत, आ. रोहित पवार हे आगामी चार वर्षे व पुढील अनेक टर्म आपल्याला ते लाभणार असून, त्यांच्याकडून जास्तीत जास्त लाभ करून घ्यावा.
आघाडी सरकार कायम कर्जत -जामखेडच्या पाठीशी राहील, आ. रोहित पवार यांचे कार्य निश्चितपणे कौतुकास्पद असून, आता कर्जत जामखेडचा सर्वांगिण विकास निश्चीतपणे होईल, असे गौरवोद्वारp कर्जत येथील पोलिस वसाहतीच्या भूमिपूजनप्रसंगी ना. देसाई बोलत होते.
अध्यक्षस्थानी आ. रोहित पवार होते पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी प्रास्तावित केले. कार्यक्रमाचे उद्घाटक गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, महाविकास आघाडीने पोलिसांच्या घरांकडे सर्वात प्रथम लक्ष दिले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असो, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार असो, त्यांचे पोलिसांकडे लक्ष आहे. पोलिसांवर कामाचा मोठा ताण असतो, सगळी कामे पोलिसांकडेच असतात, पोलिस किती काम करतात हे मात्र कुणी पाहत नाहीत, कोरोनाच्या काळात सर्वात मोठे काम पोलिसांनी केले.
अशा पोलिसांना आपण काही सुखसुविधा दिल्या पाहिजेत, यासाठी सर्वात प्रथम आ. पवार यांनी आपल्या मतदारसंघात पोलिस वसाहतीसाठी पाठपुरावा केला, असे त्यांनी नमूद केले. यावेळी अनेक मान्यवरांची भाषणे झाली. सर्वच मान्यवरांनी आ. पवार यांच्या कार्यपध्दतीवर स्तुतीसुमने उधळली.