अहमदनगर बातम्या

अहमदनगर जिल्ह्यातील शेतकर्यांसाठी सर्वात महत्वाची बातमी

अहमदनगर Live24 टीम, 19 ऑक्टोबर 2021 :- जिल्ह्यातील 1 हजार 91 शेतकरी हे राज्य सरकारच्या महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेत पात्र असून त्यांची नावे सरकारच्या कर्जमाफी योजनेत आलेली आहे.

मात्र, या शेतकर्‍यांनी अद्याप आधार प्रामाणिकरण केलेली नाही. या शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी आधार प्रामाणिकरण आवश्यक असून यासाठी राज्य सरकारच्या सहकार खात्याकडून आता एक महिन्यांची अखेरी संधी देण्यात आलेली आहे.

यात त्यांनी आधार प्रामाणिकरण न केल्यास पात्र असतांनाही हे कर्जमाफीला मुकणार आहेत.महाविकास आघाडी सरकारने राज्यातील शेतकर्‍यांना दोन लाखांपर्यंत कर्जमाफी योजना आणली होती. यात जिल्ह्यातील 2 लाख 86 हजार 861 शेतकर्‍यांना 1 हजार 741 कोटी 58 लाख रुपयांचा लाभ झालेला आहे.

जिल्ह्यातील 2 लाख 90 हजार शेतकर्‍यांच्या कर्जखात्याला विशिष्ट क्रमांक प्राप्त झालेला असून यातील 2 लाख 89 हजार 9 कर्जखात्याचे प्रामाणिकरण झालेले आहे. जिल्ह्यात अद्यापही 1 हजार 691 कर्ज खात्यांचे आधार प्रमाणिकरण बाकी आहे. यामुळे सरकारच्या खर्जमाफीच्या यादीत नावे येवूनही त्यांच्या खात्यावर कर्जमाफीचे पैसे जमा झालेले नाहीत.

या सर्वांसाठी राज्य सरकारने आता एक महिन्यांची मुदत देवून शेवटची संधी दिलेली आहे. यात 15 ऑक्टोबर ते 15 नाव्हेंबर या कालावधीत संबंधीत कर्जमाफीस पात्र असणार्‍या शेतकर्‍यांनी आधार प्रमाणिकरण करणे आवश्यक आहे.

यासाठी नजिकच्या सेतू कार्यालयात अथवा जिल्हा बँकेत येवून आधार प्रामाणिक करण्याचे आवाहन सहकार खात्याने केले आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts