Ahmednagar Mahanagarpalika :- अहमदनगर शहरातील नागरिकांना महापालिकेने मोठी सवलत दिली आहे. त्यानुसार पुढील महिनाभर घरपट्टीच्या थकबाकीवर लावण्यात येणारी शास्ती म्हणजेच दंडात्मक रक्कम शंभर टक्के माफ करण्यात आली आहे.
त्यामुळे ज्या नागरिकांकडे थकबाकी असेल, त्यांनी ताबतोब भरावी, असे आवाहन करण्यात आले आहे.शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी यासंबंधीची मागणी केली होती.
नवे आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी ती मंजूर केली असून सवलत देण्याचा आदेश लागू करण्यात आला आहे. ऑगस्ट अखेरपर्यंत ही शास्ती माफी असणार आहे. थकबाकीच्या दोन टक्के शास्ती आकरली जाते.
ती माफ करण्यात येणार असल्याने केवळ थकीत रक्कम नागरिकांना भरावी लागणार आहे. या माफीमुळे महापालिकेची सुमारे शंभर कोटी रुपयांचे नुकसान होणार असले तरी २३२ कोटी रुपयांच्या वसुलीचा मार्ग मोकळा होईल, अशी अपेक्षा आहे.