अहमदनगर येथील प्रफुल्ल सूर्यवंशी या याचिकाकर्त्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात ऍड. प्रतीक्षा काळे यांच्या मार्फत अनुकंपा तत्वावर नियुक्ती मिळावी यासाठी दाखल केलेला विनंती अर्ज संबंधित विभागाने निकाली काढावा या मागणी कामी याचिका दाखल केली होती.
सदर याचिकेवर दि. १२ एप्रिल २०२४ रोजी सुनावणी झाली. यावेळी ऍड. प्रतीक्षा काळे यांनी याचिका कर्त्यांची बाजूने युक्तिवाद केला तर यांनी प्रतिवादी ही बाजू मांडली. दोन्ही पक्षाच्या युक्तिवादानंतर न्यायमूर्ती वि. भा. कंकणवाडी व न्यायमूर्ती चपळगावकर यांच्या खंडपीठाने
सदर याचिका कर्त्याचा अनुकंपा तत्त्वावरील नियुक्ती कामे दाखल केलेला प्रस्ताव येत्या पंधरा दिवसांच्या आत निकाली काढत सदर याचिका कर्त्याला नियुक्ती देण्याचे आदेशित केले आहे.सविस्तर हकीकत आशी सदर याचिका कर्त्याचे वडील शिपाई म्हणून संस्थेमध्ये कार्यरत होते.
दरम्यान सेवेत असताना त्यांचा मृत्यू २०१३ मध्ये झाला त्यानंतर याचिका कर्त्याच्या आईने मयत पतीच्या जागेवर नोकरी मिळावी यासाठी संस्था व संबंधित कार्यालयाचे उंबरठे झिजविले. परंतु त्यांना कोणत्याही प्रकारचा न्याय मिळाला नाही. त्यानंतर याचिकाकर्ता सज्ञान होताच त्यांनीही अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळावी या कामी पाठपुरावा करण्यास सुरुवात केली.
२०१४ ते २०२४ पर्यंत सततचा पाठपुरावा करूनही संस्था व संबंधित अधिकारी यांनी याचिकाकर्त्यांना कोणत्याही प्रकारे प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे याचिकाकर्त्यांनी न्यायच्या आशेने सदर याचिका दाखल केली होती