अहमदनगर बातम्या

नगर तालुक्यातील विविध रस्त्यांचा प्रश्न मार्गी ! ८ कोटी रुपयांचा निधी मंजूर

Ahmednagar News : नगर तालुक्यातील विविध रस्त्यांसाठी निधी मंजूर झाला असून, यातुन प्रलंबित असलेल्या रस्त्यांचे काम मार्गी लागणार आहे. परिसरातील नागरिकांची होणारी गैरसोय दूर होणार असल्याची माहिती आमदार प्राजक्त तनपुरे यांनी दिली.

राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघातील नगर तालुक्यातील बुऱ्हाणनगर – आगडगाव-कोल्हार कोल्हूबाई घाट रस्ता कामाची तसेच वडगाव गुप्ता ते पिंपळगाव माळवी-जेऊर पिंपळगाव उज्जैनी रस्त्याची कामाची निविदा प्रक्रिया दि. २२ जानेवारी पासून सुरु होणार असल्याचेही आ. तनपुरे यांनी सांगितले.

नगर तालुका व पाथर्डी तालुक्याला जोडणारा महत्वाचा रस्ता कोल्हार घाट या रस्त्याच्या कामासाठी आमदार तनपुरे यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून अर्थसंकल्पात तरतूद करून ८ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या रस्त्यामुळे पाथर्डी तालुक्यातील कोल्हार, शिराळ चिंचोडी भागातील नागरिकांची अनेक वर्षापासूनची मागणी पूर्ण होत आहे.

या भागातील नागरिकांना जिल्हाच्या ठिकाणी जाणे येणे करीता या रस्त्याची अत्यंत गरज होती. हा रस्ता अतिशय खराब अवस्थेत असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या रस्त्यामुळे आता नागरिकांची गैरसोय दुर होणार आहे.

वडगाव गुप्ता पिंपळगाव माळवी ते गवारेवस्ती, जेऊर ते पिंपळगाव उज्जैनी यारस्त्यासाठी अर्थसंकल्पीय तरतूदीतून २ कोटी २७ लाख २४ हजार रुपयांचा निधी मंजूर केला असून याचीही निविदा प्रक्रिया दि. २२ जानेवारी पासून सुरु होणार आहे.

या रस्त्यांमुळे पिंपळगाव माळवी, पिंपळगाव उज्जैनी, डोंगरगण मांजरसुंभा या गावांची गैरसोय दुर होणार असल्याचे आमदार तनपुरे यांनी सांगीतले. बुन्हाणनगर आगडगाव कोल्हार रस्ता सुधारणा करणे, अहमदनगर बुऱ्हाणनगर आगडगाव कोल्हार रस्तामध्ये सुधारणा करणे,

वडगाव गुप्ता ते पिंपळगाव माळवी ते गवारे वस्ती, जेऊर ते पिंपळगाव उज्जैनी रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे या कामाच्या निविदा निघणार असल्याचे आमदार तनपुरे यांनी सांगितले.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts