अहमदनगर बातम्या

पाऊस काही थांबेना ! राजुरीत पाऊस, प्रवरानगर कारखाना परिसरात वादळ

Ahmednagar News : राजुरी परिसरात पाऊस तर प्रवरानगरमध्ये वादळी वाऱ्यासह अनेक ठिकाणी झाडाच्या फांद्या वाऱ्यामुळे पडल्याचे चित्र गुरुवारी अनेक ठिकाणी पाहाव्यास मिळाले आहे.

राहता तालुक्यातील राजुरी, बाभ ळेश्वर, प्रवरानगर या गावांसह अनेक ठिकाणी गुरुवारी संध्याकाळी चार ते पाच वाजण्याच्या सुमारास अचानकपणे वादळी वाऱ्याने अनेक ठिकाणी नागरिकांची धांदल उडाली.

वादळी वारा इतका होता की पुढे रोडवरून जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना रोडही दिसत नव्हता. त्यातच प्रवरानगर कारखाना परिसरातील नारळाच्या फांद्या वादळामुळे अनेक ठिकाणी पडत होत्या. वादळामुळे अनेक ठिकाणी नागरिक रोडवर थांबून घेतल्याचे चित्र पाहावयास मिळत होते.

काही ठिकाणी छपराचे छतही उडाले. बुधवारी थोड्याफार प्रमाणात राजुरी पाऊस झाला. गुरुवारीही काही प्रमाणात पाऊस झाल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये पाऊस सुरू झाल्यामुळे आनंद दिसू लागला आहे.

काही शेतकरी वर्गामध्ये शेतात असणारे कांदे झाकण्याची लगबग चालू असल्याचे पाहावयास मिळाले. द्राक्षा उत्पादक शेतकऱ्याची वादळ व पाऊसामुळे धावपळ उडाली.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts