अहमदनगर बातम्या

पाथर्डी तालुक्यातील ‘त्या’ गोळीबारामागील खरे कारण आले समोर ..!

Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यातील सैदापूर (हत्राळ) गावात माणिक सुखदेव केदार यांच्यावर रिव्हालवरमधून दोन गोळ्या झाडल्याची घटना घडली होती. यातील एक गोळी लागून केदार हे जखमी झाले, प्रत्यक्षदर्शींनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. तर जखमीला पुढील उपचारासाठी नगर येथे पाठविण्यात आले होते.

दरम्यान आता या गोळीबारामागील खरे कारण आले समोर असून पती पत्नीचा घटस्फोट झाल्यानंतर तिने दुसरे लग्न केल्यामुले हा गोळीबार केला असल्याचे समोर आले आहे.

या घटनेतील जखमी माणिक सुखदेव केदार यांचा मुलगा किरण केदार याने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी बडे याच्या विरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

किरण केदार याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि मी सध्या स्पर्धा परीक्षा देत असून माझी पत्नी सोनाली हीचा यापूर्वी बडे याच्याशी विवाह झाला होता, मात्र मागील वर्षी त्यांचा रीतसर घटस्फोट सुद्धा झाला आहे.

बुधवारी रात्री बडे हा आमच्या घरी आला व त्याने सोनाली हिला मी तुला एवढे जपत असतानाही तू दुसरे लग्न का केले, असे म्हणत मारहाण केली. यावेळी त्याच्या हातात पिस्तूल असल्याने माझे वडील माणिक केदार हे बडे याला समजावून सांगत असताना त्याने पिस्तूलमधून माझ्या वडिलांच्या छातीत गोळी मारल्याने ते गंभीर जखमी झाले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

दरम्यान, या घटनेनंतर घटनास्थळी जमलेल्या गावातील नागरिकांनी बडे याला चोप देत त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले होते. आज बडे याला या गुन्ह्याचे तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सचिन लिमकर यांनी न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्याला येत्या १ जूलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत .

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts